जिल्ह्य़ात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून एक लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पिके घेतली जात आहेत. त्यात ७ हजार हेक्टरवर हरभरा, ३५ हजार हेक्टरवर गहू आणि ५ हजार हेक्टरवर जवस, राजमा इत्यादी पिके घेण्यात येतील. उल्लेखनीय म्हणजे, हरभऱ्याच्या जाकी जातीच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे मिळेल ती बियाणे शेतकरी पेरत आहे. जाकी ही हरभऱ्याची जात दुपटीने पीक देणारी जात आहे आणि ती जबलपूर, अकोला आणि इनक्रिसेंट या संशोधन केंद्राने संयुक्तपणे मिळून विक सित केली आहे. एका एकराला ७५ किलो बियाणे लागते आणि किमान २५ क्विंटल उत्पन्न शेतक ऱ्याला मिळते. हरभऱ्याला ३७०० ते ४००० रुपये भाव आहे. त्यामुळे या पिकाकडे ओढा आहे. हरभऱ्यासाठी सुपर फॉस्फेट आणि बीएपी या खतांची आवश्यकता असते आणि ही खते मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत, अशी माहिती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विज्ञान केंद्राचे संशोधक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिली आहे. शेतक ऱ्यांनी मात्र गव्हाच्या याच जातीचा पेरा मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
यवतमाळात हरभऱ्याच्या ‘जाकी’ बियाण्यांचा तुटवडा
जिल्ह्य़ात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून एक लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पिके घेतली जात आहेत. त्यात ७ हजार हेक्टरवर हरभरा, ३५ हजार हेक्टरवर गहू आणि ५ हजार हेक्टरवर जवस, राजमा इत्यादी पिके घेण्यात येतील. उल्लेखनीय म्हणजे, हरभऱ्याच्या जाकी जातीच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे मिळेल ती बियाणे शेतकरी पेरत आहे.
आणखी वाचा
First published on: 16-11-2012 at 05:39 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhara seeds stock is less in yavetmal