जिल्ह्य़ात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून एक लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पिके घेतली जात आहेत. त्यात ७ हजार हेक्टरवर हरभरा, ३५ हजार हेक्टरवर गहू आणि ५ हजार हेक्टरवर जवस, राजमा इत्यादी पिके घेण्यात येतील. उल्लेखनीय म्हणजे, हरभऱ्याच्या जाकी जातीच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे मिळेल ती बियाणे शेतकरी पेरत आहे. जाकी ही हरभऱ्याची जात दुपटीने पीक देणारी जात आहे आणि ती जबलपूर, अकोला आणि इनक्रिसेंट या संशोधन केंद्राने संयुक्तपणे मिळून विक सित केली आहे. एका एकराला ७५ किलो बियाणे लागते आणि किमान २५ क्विंटल उत्पन्न शेतक ऱ्याला मिळते. हरभऱ्याला ३७०० ते ४००० रुपये भाव आहे. त्यामुळे या पिकाकडे ओढा आहे. हरभऱ्यासाठी सुपर फॉस्फेट आणि बीएपी या खतांची आवश्यकता असते आणि ही खते मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत, अशी माहिती पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विज्ञान केंद्राचे संशोधक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिली आहे. शेतक ऱ्यांनी मात्र गव्हाच्या याच जातीचा पेरा मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा