अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन नाना अशोक पवार (वय २५, रा. बारगाव नांदूर, राहुरी) याला न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली.
जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी या खटल्याचा निकाल आज दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा गायके-कापसे यांनी काम पाहिले. खटल्यात एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले.
दि. २५ जानेवारी २०१२ रोजी ही घटना घडली. नाना पवार याने गावातीलच अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे सहा महिने, नंतर तुळजापूर येथे नेले, तेथे तीच्यावर बलात्कार केला व पुन्हा राहुरी येथे आणले. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी त्यानुसार भादवि ३७६, ३६६, ३६३ नुसार गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Story img Loader