शेतकऱ्यांचे प्रश्न सामाजिक व आíथक स्वरूपाचे असून शेतकरी आज सरकारच्या धोरणामुळे आत्महत्या करू लागला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच त्याच्या हक्कासाठी सरकार कुणाचेही असले तरी आपल्याला लढावेच लागणार असल्याचे प्रतिपादन तिरोडा आमदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे किसान परिषदेच्या वतीने आयोजित किसान महासंमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साकोलीचे आमदार पटोले होते. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले, नारायणराव जांभुळे, गोंदिया बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे, शेतकरी कृषक सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भिकाजी चव्हाण, सरपंच गोपिका गजभिये, संयोजक गोिवद तुरकर, बाजार समिती संचालक आनंदराव तुरकर, तुलसी बोहणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बोपचे म्हणाले की, ३६ वर्षांपूर्वी किसान अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यास सुरुवात केली. त्यावेळी धानाला २५० रुपये िक्वटल भाव होता. त्या २५० रुपयात त्याच काळात एक तोळा सोने खरेदी करता येत होते, परंतु आज १ िक्वटल धानाला १००० ते १२०० रुपये दर मिळत असून एक तोळा सोन्याची किंमत ३० हजारावर गेली आहे. आज सोने किती पटीने महाग झाले, परंतु शेतकऱ्यांच्या धानाला किंमत मिळालेली नाही. त्यामुळेच उत्पादन खर्चावर आम्ही भाव मागतो.
यावेळी बोलताना स्वाभिमान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, जोपर्यंत शेतकरी संघटित होणार नाही, तोपर्यंत त्यांचा आवाज बुलंद होणार नाही. कापूस, सोयबीन उत्पादकांच्या तुलनेत ऊस उत्पादक कमी आहेत, परंतु त्यांनी संघटित होऊन आपल्या पदरी शासनाला झुकवले. आपल्यातील असंघटितपणाचा फायदा घेऊन आपल्याला लुबाडले आहे. स्वहितासाठी लढण्याची गरज असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष म्हणून बोलताना आमदार पटोले म्हणाले की, निसर्गाने आम्हाला भरपूर काही दिले, परंतु त्यास योग्य दिशा देऊ शकलो नाही. लाचारीमुळे आम्ही आपले अस्तित्व हरपून बसलो. इंग्रज गेले असले तरी, त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी आजही गोंदिया-भंडारा जिल्ह्यात काही नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे, तर ज्याचा नेता ‘व्यापारी’ तेथील जनता ‘भिकारी’ ही अवस्था आमच्या भागातली असून कधीपर्यंत आम्ही त्यांच्यामागे धावत आपल्या हक्काचा आवाज दाबून ठेवणार, असा प्रश्न करीत आता शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढण्याशिवाय पर्याय नाही. अदानीने रोजगार मिळणार नसून तो शेतकरी विरोधी प्रकल्प आहे. सिंचनाचे पाणी त्या प्रकल्पाला देऊन आमची शेती ओसाड ठेवण्याचे षडयंत्र सत्ताधारी नेते करीत असल्याचे पटोले म्हणाले. आपल्या हक्कासाठी शेतकरी बांधवांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक किसान परिषदेचे सचिव गोिवद तुरकर यांनी केले, तर संचालन छत्रपाल तुरकर यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा