सुरक्षिततेबरोबरच सध्याच्या काळात औद्योगिक क्षेत्रासाठी आरोग्य व पर्यावरण हेही विषय महत्वाचे आहेत, त्याकडेही बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकूंड यांनी केले.
केएसपीजी ऑटोमोटिव्ह कंपनीच्या सुरक्षा सप्ताहाचा समारोप त्यांच्या उपस्थितीत झाला. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पी. डी. मनवेलीकर, ज्ञानेश्वर ढमाले, व्ही. बी. डोंगरे, ए. झेड. कासवा, व्ही. ए. शेडाळे, आर. ई. कांडेकर, व्ही. एन. खराडे आदी यावेळी उपस्थित होते. सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धामधील विजेते कामगार सर्वश्री अनंत जोशी, एस. एन. वाघ, बी. ए. भडके, वाय. एम. सत्रे, जी. जी. वाकचौरे, ए. बी. साह, आर. आर. देशपांडे, एल. डी. बडे, एम. व्ही. चौधरी, बी. एस. घोंगडे, ए. बी. तांदळे, येणारे आदींना बक्षिसे देण्यात आली. बी. एन. खेडकर यांनी अहवाल वाचन केले. एन. एल. जगताप यांनी आभार मानले.
लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीतही पोलीस उपअधीक्षक शाम घुगे यांच्या उपस्थितीत सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला. सरव्यवस्थापक के. के. शुक्ला, अरविंद पारगावकर, संदीप महाजन, नागेश आढाव यावेळी उपस्थित होते. आर. एम. कुताळ यांनी सप्ताहातील विविध उपक्रमांची माहिती दिली. घुगे यांनी सुरक्षेचे महत्व विषद केले. सुरेश फडतरे, संदीप लोंढे यांचीही भाषणे झाली. स्पर्धामधील विजेते कर्मचारी वर्षां कराळे, जे. एस. इंगळे, नयना कानडे, रंजना पैठणकर, श्वेता घुले, ए. एस. शिंदे, एस. टी. रोहकले, एस. डी. ढोळ, बी. एम. मुळे. एस. जी. मंगाडे, के. डी. बोडखे, ए. पी. माळी, सुरेखा ठोसे, मनिषा शेळके, योगिता गवांडे, अनिता शिंदे, रविंद्र गुणे यांना बक्षिसे देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा