केवळ दहावी व बारावीच्याच नव्हे तर शालेय शिक्षण घेणाऱ्या केजी टू आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर दप्तराबरोबरच खाजगी शिकवणी वर्गाचे ओझे दिले जात असल्याने मुलांचे बालपण हिरावून घेतले जात असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे.
दप्तरांच्या ओझ्यांनी आधीच बालपण हिरावलेले विद्यार्थी आता शिकवणी वर्गासाठीसाठीही धडपड करताना दिसतात. गेल्या महिन्यात २६ जूनपासून शाळा सुरू झाल्या. पाठीवर दप्तराचे ओझे, त्यात खूप सारी पुस्तके व वह्य़ा, एका हातात डब्बा असलेली बास्केट आणि दुसऱ्या हातात वॉटरबॅग असे स्वत:च्या जीवापेक्षा जास्त ओझे घेऊन हे विद्यार्थी शाळेत ये-जा करताना दिसतात. मात्र, उर्वरित वेळेतही विद्यार्थ्यांनी घरी मोकळे राहण्यापेक्षा शिकवणी वर्गात जावून वेळ घालवावा, असा पालकांचा आग्रह असतो. याशिवाय अभ्यासाचे वेगळे ओझे लहान मुलांच्या मानगुटीवर बसवण्यात आले आहे. गृहपाठ आणि शिकवणी वर्गाची वेगळीच काळजी विद्यार्थ्यांना वाहावी लागत आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळापेक्षाही सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे ओझे जास्त आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची संख्या २० आहे. जेव्हा की विद्यार्थी तिसरीत असेल तर त्याच्या पुस्तकांची संख्या २५ आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगेत २६ पुसत्के आणि वह्य़ा दिसतात.
दप्तराला पाठीवर लटकवल्यानंतर विद्यार्थी वाकतात. दोन्ही हात टिफिन बॉक्सची बास्केट व पाण्याच्या बाटलीने बांधलेले असताना त्या सर्व वस्तू सावरत विद्यार्थी ऑटो, बस पकडतात. ऑटो, बस किंवा व्हॅनमध्येही अशी काही गर्दी असते की पाठीवरचे ओझे काढून ते त्याच ठिकाणी ठेवायला जागा नसते. एकमेकांच्या अंगावर वस्तू ठेवणे किंवा त्या एकमेकांना लागणे आणि त्यातून उद्भवणारी भांडणे हा आणखी वेगळाच प्रकार असतो. पाठीवरील ओझ्याने पाठ का दुखेना पण, पुस्तके कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. काही शाळांमध्ये गृहपाठासाठी वेगळा तास ठेवण्यात आला आहे. खेळासाठी दिवस निश्चित करण्यात आला आहे. मात्र, शिक्षकाची करडी नजर विद्यार्थ्यांवर असल्याने गणिताच्या तासाप्रमाणेच खेळाचा तास असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा