जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले. नुकसानीबाबत पहिल्या अहवालावरून ६ कोटी ७ लाखांची मदत देण्यात आली. मात्र, नव्याने प्राप्त अहवालात १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळताच शेतकऱ्यांना पीकनुकसानीची मदत वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मंत्री कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आतापर्यंतची चौथी आढावा बठक घेण्यात आली. बठकीनंतर आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी पत्रकार बठकीत कदम बोलत होते. पंचायत राज्य समिती अध्यक्ष तथा वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर, आमदार गोरेगावकर व राजीव सातव, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे आदींची उपस्थिती होती. कदम यांनी सांगितले, की राज्यात आतापर्यंत पिकांच्या नुकसानीवर ४५० कोटींचा निधी वितरित करण्यात आला. पुरवणी मागणीत २ हजार कोटींची मागणी नोंदविली. येत्या १५ नोव्हेंबपर्यंत त्याला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. िहगोली जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी होऊन शेतातील पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले. सुरुवातीच्या प्रस्तावाप्रमाणे ६ कोटी ७ लाखांच्या पिकांच्या नुकसानीबाबत निधी देण्यात आला. मात्र, नव्याने प्राप्त अहवालानुसार १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यावर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येईल.
कापसावरील लाल्यारोग व रस्त्यांच्या दुरवस्थेवर विचारले असता कापसावरील लाल्याचा स्वतंत्र अहवाल, तसेच जिल्ह्यातील रस्त्यांचे, पुलांचे नुकसान, नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे नुकसान याबाबत स्वतंत्र अहवाल पाठविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम, जि.प. व नगरपरिषद यांना सूचना दिल्या असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बँकेच्या विभाजनावर पाटील यांना विचारले असता िहगोली जिल्हा बँकेचा प्रस्ताव नाबार्डकडे सादर केला आहे. मात्र, निकषात बसत नसल्याने नाबार्डने प्रस्ताव अमान्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader