विदर्भातील शेतक ऱ्यांनी आता नापिकीची धसला घेतला असून एका शेतक ऱ्याचा शेतातच मृत्यू झाला असून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीग्रस्त मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.
यवतमाळ जिल्ह्य़ातील वांजरी येथील शेतकरी रामकृष्ण बापूराव कावडे यांनी अतिवृष्टीचा धसका घेऊन शेतातच प्राण सोडला. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात पडून होता. गेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्य़ातील पन्हाळा येथील शेतकरी भिका राठोड व अमरावती जिल्ह्य़ातील सोनोरी येथील शेतकरी दिलीप आठवले यांनी नापिकी व सरकारी मदत न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या. सरकारने अशीच उदासीनता ठेवली तर अनेक शेतकरी आत्महत्या करतील, असा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला आहे. त्यांनी वांजरी येथे घटनास्थळी भेट दिली. अतिवृष्टीमुळे संपूर्ण वांजरी परिसरात नापिकी झाली आहे. सरकारकडून मदत तर मिळाली नाही. साधी विचारपूसही न झाल्यामुळे नैराश्यातून रामकृष्ण कावडे यांचा जीव गेला, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने कसर भरून काढली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांनी घाईन अहवाल पाठविल्यामुळे पुराचा फटका बसलेले व नापिकीग्रस्त ७० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने मदत घोषित करताना नापिकी, नवीन पीक कर्ज, पुढील सहा महिन्यांसाठी अन्न सुरक्षा, व्यावसायिक शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना संपूर्ण माफी व पावसामुळे आजार पसरले असतील तेथे आरोग्य सुविधा उपलब्ध केलेली नसल्यामुळे आरोग्यसेवेचा खर्च आता सरकारने उचलावा, विदर्भात अतिवृष्टीने दहा लाख हेक्टरमधील खरीप पिके नष्ट झाली असून शेतकऱ्यांना कमीत कमी २० हजार कोटींचा फटका बसला आहे. २५ लाख हेक्टरमधील पिके नापिकीग्रस्त झाली आहेत. विदारक परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ मदत देण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे.
गावक ऱ्यांनी गाव सोडले..
घाटंजी तालुक्यातील भीमकुंड व गणेरी येथील पुराचा फटका बसलेल्या शंभर कुटुंबांनी गाव सोडून माळरानावर आश्रय घेतला आहे. या पूरग्रस्तांची उपासमार होत आहे. यातील बालके व वृद्ध आजारी आहेत, अशी माहिती सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोहुर्ले यांनी दिल्यावर तिवारी यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरविली. पूरपीडित उपासमारीला तोंड देत असताना खासदार हंसराज अहीर व समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे परिसरात उद्घाटन व भूमिपूजन समारंभ घेत आहेत, ही शोकांतिकाच आहे, असे तिवारी म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा