सोमवारी रात्रभर, तसेच मंगळवारी दुपारपर्यंत जालना शहर परिसरात पावसाने जोरदार बरसात केली. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जालना शहर व तालुक्यात ३१.२५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे मंगळवारी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अंबड तालुक्यातही पावसाने चांगली (२५ मिमी) वृष्टी केली. परतूर, बदनापूर व घनसावंगी तालुक्यात चांगला पाऊस झाला.
जिल्ह्य़ात सर्वाधिक (२४२ मिमी) पाऊस जाफराबाद तालुक्यात, तर त्या खालोखाल (१९० मिमी) पाऊस जालना तालुक्यात झाला. बदनापूर १२८, भोकरदन १६३.७५, परतूर १०९.७, मंठा ८१, अंबड १६९.७१ व घनसावंगी १०५.५७ मिमी याप्रमाणे जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यांतील आजपर्यंतचा पाऊस आहे. जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या पावसाची सरासरी १४८.७३ मिमी आहे.

Story img Loader