दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी वरुणराजाने करवीरनगरीत हजेरी लावली. दुपारी सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे अवघे शहर चिंब झाले होते. सायंकाळी पावसाने उघडीप दिली तरी आकाशात काळ्या मेघांची दाटी झाली होती. भूपाल टॉवर, व्हीनस कॉर्नर, हॉकी स्टेडियम, कळंबा आदी भागांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची कुचंबणा झाली होती. तर रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील रजपुतवाडी येथे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती.    
जून महिना उजाडल्यापासून वळीव पावसाची हजेरी सुरू होती. मात्र गेले दोन दिवस पावसाचे दर्शन झाले नव्हते. कालपासून हवेतील उष्माही वाढला होता. बुधवारी सकाळपासून ऊन-सावलीचा पाठलाग सुरू होता. हा खेळ दुपारी आलेल्या पावसाने थांबविला. सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. यामुळे शहराच्या सर्व भागात पाणी साचले होते.     
हॉकी स्टेडियम, व्हीनस कॉर्नर, भूपाल टॉवर, कळंबा या ठिकाणी असलेल्या सखल भागात पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचले होते. भूपाल टॉवरजवळ फोटोफ्रेम, लॉटरीचे विक्रेते आहेत. जोरदार पाऊस आणि साचलेले पाणी यामुळे या विक्रेत्यांना अन्यत्र आसरा घ्यावा लागला. पावसातच त्यांनी साहित्य हलविण्यास सुरुवात केली होती. पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यांवर तसेच गटारीतून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने भर पावसाळ्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार याची झलकच आजच्या पावसाने दाखवून दिली.     
कोकणातून होणारी वाहतूक रत्नागिरी-कोल्हापूर राज्यमार्गाने होत असते. कोल्हापूरपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या रजपुतवाडी या गावाच्या हद्दीमध्ये एक मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडला होता. जोरदार पावसामुळे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला समजल्यानंतर त्यांचे पथक तेथे दाखल झाले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून पडलेले झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतुकीला पूर्ववत सुरुवात झाली.
 

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
Story img Loader