आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर आलेल्या हेलन चक्रीवादळामुळे ऐन हिवाळ्यात नगर जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात रविवारी चांगला पाऊस पडला. सुमारे अर्धा ते एक इंचापेक्षा तालुक्यात पाऊस झाल्याने त्याचा रब्बीच्या पिकांना मोठा फायदा होणार आहे. आता जिरायत गावरान ज्वारी व हरबऱ्याचे पिकाला पाण्याची गरज भासणार नाही. राहुरी व राहाता तालुक्यातही चांगल्या पावसाने हजेरी लावली.
गेल्या आठवडय़ात थंडीने हुडहुडी भरवीली होती. पण पावसामुळे थंडीचा जोर कमी झाला. रविवारी रात्री ११ ते २ च्या दरम्यान तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस टाकळीभान येथे ६४ मिलीमीटर झाला. तालुक्यात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे(मीलीमीटरमध्ये) श्रीरामपूर २१, बेलापूर २०, उक्कलगाव ३७, कारेगाव ३६, उंदिरगाव १५, अशोकनगर २४, पढेगाव ३८, वांगी ७, टाकळीभान ६४, कमालपूर २०, निमगावखैरी २२, खानापूर १८, पाचेगाव ४४, बेलिपपळगाव २९, मालुंजा २१, वडाळामहादेव २१, खंडाळा ३१, लोणी ९, आश्वी १०.
या पावसामुळे ज्वारी, हरबरा, तूर व ऊस या पिकांना फायदा होणार आहे. कपाशी व लाल कांद्याचे नाममात्र नुकसान होईल पण नुकसानीपेक्षा पावसाचा फायदाच अधिक होणार आहे. पावसामुळे भंडारदरा धरणाचे आवर्तन लांबले तरी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही. उलट आता दहा, बारा दिवस आवर्तन उशिरा सोडले तर त्याचा फायदा होईल. उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा