गेले दोन दिवस पाहून पंढरपूरकरांना उकाडय़ाने हैराण केले होते अशातच सुटणारे वारे आकाशात जमलेले ढग आता जोराचा पाऊस येणार असे वाटत असताना हलक्या सरी पडून जात परंतु बुधवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून पहाटे चार तसेच गुरुवारी सकाळी दोन तास पावसाने झोडपून काढले.
रोहिण्या संपण्यास अन् सात जूनपासून मृग नक्षत्र लागणार असून रोहिण्याने चांगलेच झोडपून काढल्याने सखल भाग अन् भुयारी गटार, विद्युत या करिता रस्ता खोदल्याने त्या वर पाणी अन् रस्त्यावर चिखल झाला आहे. या पडलेल्या जोरदार पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले आहे.

Story img Loader