गणेशोत्सवासाठी कल्याण-डोंबिवली शहरातील अवजड वाहतूक प्रशासनाने बंद केल्याने शहरात कोठेही वाहतूक कोंडी आढळून येत नाही. गजबजलेला शिवाजी चौकही वाहतूक कोंडीपासून मुक्त असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस चौकाचौकात गस्त घालीत असल्याने आणि पोलीसही भरधाव दुचाकीस्वारांना कायद्याचा हिसका दाखवित असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे. कल्याण शहरातून २४ तास अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने शहरात सतत वाहतूक कोंडी होत होती. गणपती सणाच्या काळात ही अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभाग, पोलीस आणि पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहरांतील रस्त्यांवर फक्त खासगी वाहने, रिक्षा, बस यांचाच वावर दिसत आहे. 

Story img Loader