कार्ला येथील एकवीरा देवीच्या मंदिरात महानवमीचा होम रविवार, १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.०० वाजता करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात भाविकांना गडावर जाण्याकरिता सवलतीच्या दरात हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. होमाच्या दिवशी गडावर जाणे शक्य न होणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळाच्या परिसरात मोठा पडदा बसविण्यात येणार असून, भाविकांना त्यावर दर्शन घेता येईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी दिली. हेलिकॉप्टर प्रवासासाठी के. रवी ९००४३७३७५५ अथवा ९७६९१३८९१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तरे यांनी केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-10-2013 at 07:11 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helicopter for ekvira devotees in navaratra