खेडेगांवामधील रूटीन आयुष्यात एखाद-दोन दिवस मौजमजा करण्याची संधी म्हणजे जत्रा. आता काळानुरूप जगण्याची पद्धत आमूलाग्र बदलली असली आणि शहरी जीवनशैलीचा फार मोठा पगडा ग्रामीण जीवनावर असला तरीही जत्रेचा प्रभाव कायम आहे. रविवारी कल्याण तालुक्यातील मलंग गड परिसरात मोठय़ा उत्साहात पार पडलेल्या जत्रेतही याचा प्रत्यय आला. यंदा डोंगरावर जाण्यासाठी एका उद्योजकाने भाविकांसाठी हेलिकॉप्टरची सोय केली होती. अर्थात या हवाई फेरीला सात हजार रुपये दर असल्याने यात्रेसाठी येणारे लब्धप्रतिष्ठित धनिक, राजकीय नेते आणि पुढाऱ्यांनीच या सोयीचा लाभ घेतला असला तरी  परिसरातील बच्चे कंपनीनेही या उडन खटोल्याचे डोळे भरून दर्शन घेतले.      
जत्रा में. फत्रा बिठाया, तीरथ बनाया पानी..
दुनिया हुई दिवानी, पैसे की धुलदानी..!
असे संत कबिराने जत्रेचे करून ठेवलेले वर्णन २१ व्या शतकातही लागू आहे. रंगीबेरंगी खेळणी, आकाश पाळणे, तंबूतल्या तात्पुरत्या थिएटरमधील जादूचे खेळ, ‘मौत का कुवाँ’ेसारखे साहसी खेळ हा जत्रेचा पारंपरिक ढाचा. गावाकडची बच्चेमंडळी विविध खेळणी विकत घेण्यासाठी जत्रेची वाट पाहत असतात. त्या खेळण्यांमध्ये सर्वाधिक मागणी असते ती अर्थातच विमान किंवा हेलिकॉप्टरला. रविवारी मलंग गडाच्या जत्रेत खरेखुरे हेलिकॉप्टर पाहता आल्याने पंचक्रोशीतील बच्चे कंपनी हरखून गेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा