कायदा संदिग्ध असून त्याचा निश्चित अर्थ लावण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यात दिलेले निर्णय हे महत्वाचे आहेत. वकिलांनी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी अॅड. देविदास कोकाटे यांचे ‘निर्दोष निवाडे’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे मत ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. अच्युत अत्रे यांनी मांडले.
निर्दोष निवाडे या कायदेविषयक पुस्तकाचे प्रकाशन अॅड. अत्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिलीप वनारसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे, दिंडोरी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. जयवंत देशपांडे, अॅड. भास्कर चौरे होते. खटल्यात युक्तीवादाच्या वेळी वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखविल्यास त्याचा फायदा निकालासाठी होतो. संशयितास निर्दोष सोडताना निवाडय़ाची मदत होते, असे स्पष्ट करताना अॅड. अत्रे यांनी न्यायालयात निवाडे देतानाचे विविध किस्से सांगितले. निवाडे हे न्यायालयास बंधनकारक असतात. ते डावलता येत नाहीत, असेही ते म्हणाले. प्रस्तावना अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी केली.
सूत्रसंचालन सुधाकर आहेरराव यांनी केले. आभार अॅड. बाळासाहेब आडके यांनी मानले. कार्यक्रमाला अॅड. बाजीराव चव्हाण, अॅड. शशिकांत क्षिरसागर, अॅड. रामराव गटकळ, अॅड. फरहाद पठाण, आदी उपस्थित होते.
पुस्तकात भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, जीवनावश्यक वस्तू कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, याशिवाय सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्याय निवाडय़ांचा समावेश आहे.
कायद्याचा अर्थ लावण्यासाठी न्याय निवाडय़ांची मदत- अॅड. अत्रे
कायदा संदिग्ध असून त्याचा निश्चित अर्थ लावण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यात दिलेले निर्णय हे महत्वाचे आहेत. वकिलांनी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
आणखी वाचा
First published on: 18-12-2012 at 02:50 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help from act meaning fullfill help for justice advocate atre