राज्यभरातील २७ जिल्हय़ांत राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत हृदयरोग, कर्करोग, मूत्रिपड विकार, मेंदूविकार, अपघात आदींवर ९७१ शस्त्रक्रिया व उपचार पद्धतींचा समावेश आहे. केशरी, पिवळी व अंत्योदय शिधापत्रिका, तसेच अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबीयांसाठी वर्षभरात दीड लाखाचा खर्च केला जाणार आहे. सरकारने विमा कंपनीसोबत करार केला आहे.
योजनेंतर्गत रुग्णाला १ रुपयाही खर्च करावा लागणार नाही. संपूर्ण पसे विमा कंपनीमार्फत खर्च केले जातील. सरकारमान्य रुग्णालयात आरोग्यमित्राची नियुक्ती केली असून, त्याच्याशी संपर्कानंतर पुढील उपचारासाठी कोणताही खर्च रुग्णाला करावा लागणार नाही. लातूर जिल्हय़ात ४ लाख ३४ हजार ७ जणांकडे स्वस्त धान्य दुकानाच्या पुस्तिका आहेत. पकी ४ लाख १८ हजार ७७२जणांना याचा लाभ होणार आहे. लातूर शहरातील बारा रुग्णालयांचा योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश केला आहे. योजनेचा कार्यभार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व राज्य सरकार यांनी नियुक्त केलेले जिल्हा समन्वयक डॉ. कुलदीप शिरपूरकर सांभाळतील. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड यांनी ही माहिती दिली.
दारिद्रय़रेषेखालील कुटुंबामधील १८ ते ३५ वयोगटातील लाभार्थ्यांना विविध व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी येथील प्रशिक्षण केंद्रास अ प्लस दर्जा दिला आहे. जिल्हय़ातील दहाही तालुक्यांच्या ठिकाणी महिला बचतगटांमार्फत उत्पादित मालासाठी विक्री केंद्रे मंजूर केली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत गेल्या २ डिसेंबरच्या निर्देशानुसार दीड हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. २०१४-१५पर्यंत जिल्हय़ात अनुसूचित जाती व दारिद्रय़रेषेखालील सर्वानाच घरकूल उपलब्ध होणार आहे. जिल्हय़ात ५ हजार ५४ घरकुले मंजूर आहेत. पकी ३ हजार ९६५ घरकुले पूर्ण झाली. घरकुलांसाठी ९५ हजारांचे अनुदान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा