कल्याण- डोंबिवली पालिकेने नागरिकांना चोवीस तास हेल्पलाइन सेवा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. म्हैसूर महापालिकेत अशा प्रकारची सेवा देण्यात येते. शिवसेनेचे नगरसेवक केतन दुर्वे यांनी अशा प्रकारची सेवा देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली.
या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या  तक्रारी मांडण्याची संधी मिळणार आहे. पालिकेत गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेली संगणक सेवा प्रथम सक्षम करावी. मग हेल्पलाइनच्या मागे लागावे, असे काही नागरिकांचे मत आहे. पालिकेच्या संगणक सुविधेसमोर अर्धा तास उभे राहिल्यानंतर नागरिकांना सेवा मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Story img Loader