थंडीच्या कडाक्याने कोल्हापूरकर गारठले असताना सायंकाळी थोडावेळ आलेल्या पावसाने त्यांना वेगळाच अनुभव दिला. अनपेक्षित आलेल्या पावसामुळे नागरिकांची गडबड उडाली. विशेषत:महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर येथे दर्शनासाठी रांगा लावलेल्या भाविकांची चांगलीच गोची झाली.
कोल्हापूर शहरात अल्पकाळ पाऊस झाला असला, तरी पश्चिमेकडील हातकणंगले व शिरोळा तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. सुमारे पंधरा मिनिटांहून अधिक काळ पावसाची रिपरिप सुरूच होती. ३१ डिसेंबरचा आनंद आजच साजरा करणाऱ्यांची या पावसाने चांगलीच गोची केली. पावसाचे आगमन झाल्यावर नेहमीप्रमाणे महावितरणने वीज बंद केल्याने नागरिकांना नववर्षांच्या पूर्वसंध्येला अंधारात राहावे लागले.

Story img Loader