महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षा ठरल्या दिवशीच होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले, तरी पुन्हा उमेदवारांना माहिती अपलोड करण्यासाठी एसएमएस, ई-मेलद्वारे कळविण्यात आल्याचा दावा सरकारने केला.
तथापि, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहतील, या कारणामुळे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या शुक्रवापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणणे सादर करावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील देशमुख व न्या. आर. एम. बोर्डे यांनी दिले.
सर्व विद्यार्थ्यांना माहिती भरण्यासाठी कशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आणि सर्व पात्र उमेदवारांपर्यंत माहिती अपलोड करण्याचे संदेश गेले आहेत काय, याची खातरजमा आयोगाने केली आहे का, याबाबतचे मत न्यायालयासमोर सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या अनुषंगाने सुनावणी होणार आहे.
एआयएसएफच्या वतीने अॅड. विनोद पाटील काम पाहत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा