विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध घेणाऱ्या करवीर कन्या राही सरनोबत हिच्या सुवर्णमय कामगिरीची नोंद घेत हायफौंडेशनने प्रतिष्ठेचा १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह स्वरूपातील पुरस्कार जाहीर केला आहे, अशी माहिती हायफौंडेशनचे विश्वस्त डॉ.श्रीवल्लभ मर्दा यांनी केली आहे. राही कोरियाहून परतल्यानंतर हायफौंडेशनचे विश्वस्त पंडितराव कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार इचलकरंजीत दिला जाणार आहे.  
कोरियातील जागतिक नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतने सुवर्णपदक पटकाविले. या कामगिरीमुळे क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्राचा व कोल्हापूर जिल्ह्य़ाचा लौकिक वाढला आहे. तिच्या सुवर्णवेध घेणाऱ्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. हायफौंडेशनच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे, असे डॉ.मर्दा यांनी सांगितले.

Story img Loader