सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक पाऊस
विदर्भासाठी मान्सून आतापर्यंत चांगलाच अनुकूल ठरला असून १० जुलैअखेर विदर्भात सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत सरासरीच्या केवळ ७६ टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या दशकभरातला हा उच्चांक ठरला आहे. संपूर्ण विदर्भात सरासरी ४७१.५ मि.मी. पावसाची नोंद विविध भागातील पर्जन्यमापकांवर झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या १५४ टक्के आहे.
मान्सूनचे आगमन वेळेत झाल्यानंतर विदर्भात सर्वदूर दमदार पाऊस बरसला. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामांना सुरुवात केली. काही भागात तर उघाड न मिळाल्याने पेरण्या लांबत गेल्या. पण, आता भाताची लागवड वगळता इतर सर्व पिकांच्या पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत.
विदर्भात जूनअखेपर्यंत पावसाने सरासरी ओलांडली होती. अनेक जिल्ह्य़ांमध्ये तर सरासरीच्या दोनशे टक्क्यांपर्यंत पावसाचा जोर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. अनेक सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जलसंचय पातळी देखील झपाटय़ाने वाढली.
विदर्भात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद वाशीम जिल्ह्य़ात झाली. या ठिकाणी सरासरीच्या २०८ टक्के पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्य़ात जुलैच्या मध्यापर्यंत २४७ मि.मी. पाऊस येतो. तो यंदा ५१५ मि.मी. इतका बरसला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांची हीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्य़ात पावसाची सर्वाधिक तूट होती. जुलैच्या मध्यापर्यंत बुलढाणा जिल्ह्य़ात सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला खरा, पण नंतर पावसाने खंड दिला आणि दुष्काळी परिस्थिती उद्भवली. अकोला जिल्ह्य़ातील काही भागालाही फटका बसला होता. पण, यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तरी अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्य़ांमध्ये समाधानकारक पावसाची स्थिती आहे. अकोला जिल्ह्य़ात ३५५ मि.मी. (१६९ टक्के), तर बुलढाणा जिल्ह्य़ात ३२८ मि.मी. (१५८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत विदर्भात वर्धा जिल्ह्य़ात सर्वात कमी पावसाची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात ४१८ मि.मी. म्हणजे सरासरीच्या १५२ टक्के इतका हा पाऊस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भातील केवळ पाच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात बुलढाणा जिल्’ाातील राळेगाव, यवतमाळ जिल्’ाातील कळंब, झरीजामनी, राळेगाव आणि गोंदिया जिल्’ाातील आमगाव या तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये आतापर्यंत ८० ते ९० टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या दोनशे टक्क्यांची मर्यादा ओलांडणाऱ्या तालुक्यांमध्ये गडचिरोली जिल्’ाातील भामरागड, देसाईगंज, अहेरी, आरमोरी, चंद्रपूर जिल्’ाातील कोरपना, ब्रम्हपुरी, वरोरा, चंद्रपूर, गोंदिया जिल्’ाातील मोरगाव अर्जूनी, गोंदिया, भंडारा जिल्’ाातील पवनी, नागपूर जिल्’ाातील उमरेड, सावनेर, पारशिवणी, वर्धा जिल्’ाातील हिंगणघाट, यवतमाळ जिल्’ाातील मोहगाव, उमरखेड, आर्णी, अमरावती जिल्’ाातील अंजनगाव सुर्जी, वाशीम जिल्’ाातील मानोरा, मंगरूळपीर, रिसोड, अकोला जिल्’ाातील पातूर तेल्हारा आणि बुलढाणा जिल्’ाातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या २८ तालुक्यांचा समावेश आहे. १० जुलैपर्यंत झालेला पाऊस पुढील प्रमाणे- बुलढाणा ३२८ मि.मी., अकोला ३५५, वाशीम ५१५, अमरावती ३७९, यवतमाळ ४३२, वर्धा ४१८, नागपूर ५०२, भंडारा ५४०, गोंदिया ५३८, चंद्रपूर ५३८, गडचिरोली ६४२ मि.मी.