युती आणि आघाडी तुटली आणि ‘मैदान’ एकदमच खुले झाले. ‘आजवरची सर्वात उत्कंठावर्धक निवडणूक’ ही बिरुदावली लोकसभा निवडणुकीने ५ महिने मिरवली होती. परंतु घटस्थापनेच्या दिवशी फाटाफूट झाली आणि ते बिरुद अलगद या निवडणुकीच्या गळ्यात पडले. हा सामना ‘पंचरंगी’ होईल, असा सूर बळेबळेच प्रसारमाध्यमे लावत होती. प्रत्यक्षात ही लढाई चौरंगीही नाही तर बहुतांश दुरंगीच झाली. भाजपा आणि शिवसेना यांच्यातच मुख्यत्वे हा सामना रंगला. यातील काही लढती निकाल घोषित होईपर्यंत उत्सुकता ताणणाऱ्या ठरल्या. मुंबईतील अशा काही मोजक्या मतदारसंघांमधील वातावरणाचा हा घेतलेला धावता आढावा!
विलंबामुळे ताणलेली उत्सुकता
घाटकोपर पश्चिम
राम कदम यांनी ‘इंजिना’तून उतरून ‘कमळ’ हाती धरल्याने घाटकोपर पश्चिममध्ये नेमके काय होणार, याची मोठी उत्सुकता होती. ही अतिशय लक्षवेधी लढत असूनही सुमारे ११.०० पर्यंत कोणती फेरी सुरू आहे, कितव्या फेरीअखेर कोणाला किती मते मिळाली आहेत, याची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. परिणामी नागरिक, ‘भाजप’ कार्यकर्ते आणि राम कदम समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. निव्वळ अंदाज आणि चर्चाना उधाण येत होते. त्याचवेळी विविध वृत्तवाहिन्यांवर मात्र राम कदम पुढे असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर ११.०४ वाजता चौथ्या फेरीतील मते घोषित झाली आणि राम कदम पुढे असल्याचे जाहीर झाले. तेवढय़ात वृत्तवाहिन्यांवरून ‘राम कदम जिंकले’ अशी बातमी पसरली आणि परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. ‘भाजप’झेंडे उंचावत कार्यकर्ते नाचायला लागले. ‘कोण आला रे कोण आला, घाटकोपरचा वाघ आला’, अशा घोषणा सुरू झाल्या. काही कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात ‘देश का नेता कैसा हो, राम कदम जैसा हो’ अशीही घोषणा दिली. मग त्यातील चूक लक्षात आल्यानंतर लगेचच त्यात दुरुस्ती करण्यात येऊन ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘घाटकोपर का नेता कैसा हो, राम कदम जैसा हो’ असा बदल करण्यात आला.
विजयाचा हा जल्लोष सुरू असतानाच मतमोजणी केंद्रातून दुपारी ११-५० च्या सुमारास सहाव्या फेरीचा निकाल जाहीर झाला. राम कदम जिंकले असल्याचा निकाल कळल्याने मतमोजणी केंद्रातील निकाल काय सांगत आहेत, याकडे त्यांचे विशेष, लक्ष नव्हते. सव्वाबाराच्या सुमारास सातव्या फेरीचा निकाल जाहीर झाला. सातव्या फेरीत राम कदम यांना २६७० व दिलीप लांडे यांना ६४० मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. उपस्थितांना वृत्तवाहिन्यांवरील निकालातून राम कदम जिंकले असल्याचे कळल्याने त्यांना पुढच्या फेऱ्यांच्या आकडेवारीची फारशी उत्सुकता नव्हतीच.
काँग्रेसला बाजूला सारून सेना- भाजपमध्येच सामना रंगला
अंधेरी (पूर्व)
वास्तविक माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी विरुद्ध रमेश लटके हा तसा अटीतटीचा सामना होण्याची शक्यता नव्हती. शेट्टी निवडून येतील, असेच समजले जात होते. परंतु येथे अनपेक्षित काँटे की टक्कर झाली. त्यातही राष्ट्रवादीच्या सुरेश शेट्टीपेक्षा सामना रंगला तो सेनेच्या रमेश लटके आणि भाजपाच्या सुनील यादव यांच्यात! अंधेरी-कुर्ला रस्त्यावर पश्चिम द्रुतगती मार्गानजिक असलेल्या गुंदवली महानगरपालिका शाळेत सकाळी आठ वाजता मोजणी सुरू झाली तेव्हाच दोन्ही बाजूंनी रस्ता बॅरीकेड्सनी बंद करण्यात आला होता. रस्त्यावर शिवसैनिकांना एकीकडे आणि भाजपाला दुसरीकडे जागा देण्यात आली. मात्र भाजपाचा एकही झेंडा फडकला तरी शिवसैनिकांमधली चीड वाढत होती आणि पोलिसांवरील ताणही..! इन मिन सहा उमेदवार असलेल्या या मतदारसंघातील यादीत तिसऱ्या क्रमांकावरील लटके यांची मते कळल्यावरही फारशा घोषणा होत नव्हत्या, मात्र पाचव्या क्रमांकावरील सुनील यादव आणि सहाव्या क्रमांकावरील शेट्टी यांची मते कमी असल्याचे कळल्यावर मात्र जोरदार आरोळ्या ठोकल्या जात होत्या. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये यादव यांची मते एकदम वाढू लागल्यावर मात्र वातावरणात तणाव निर्माण झाला होता. सुरेश शेट्टी दुसऱ्या क्रमांकावर यावेत अशी इच्छा शिवसैनिकच आपापसात बोलत होते.. तिरंगी लढतीत अटीतटीने लढवल्या गेलेल्या या मतदारसंघात अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये दुसऱ्या बाजूने भाजपाचे काही झेंडे वर झाले तेव्हा सैनिक भराभर त्या दिशेने गोळा होऊ लागले आणि पोलिसांनी बॅरीकेड्ससोबत स्वत:चीही कडी मजबूत केली. मात्र हे तणावाचे क्षण निकालानंतर निवळले आणि ढोलताशा, फटाक्यांच्या आवाजात सेनेची विजयाची रॅली निघाली..
जिंकल्यावर ध्यान सोडले!
वरळी
अपेक्षितच!
बोरिवली
बोरिवलीत भाजपचे विनोद तावडे विक्रमी मतांनी निवडून येतील हे अपेक्षितच होते. त्यातून तावडे यांच्या खांद्यावर तर राज्याचा गाडा चालविण्याची धुरा. त्यामुळे, ते मतमोजणी केंद्रावर फिरकतील अशी अपेक्षाच नव्हती. त्यामुळे, मतांची विक्रमी आघाडी घेऊनही येथील भाजपच्या कायकर्त्यांमध्ये सुरुवातीला जल्लोषाचे वातावरण नव्हते. मतमोजणी केंद्राबाहेर कायकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पण, यातलेही कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे हे समजून येत नव्हते. दुपारी दोनच्या सुमारास तावडे यांचे येथे आगमन झाल्यानंतर मात्र वातावरणात एकच उत्साह संचारला.
विजयरथावर तावडे यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यासमवेत खासदार आणि बोरिवलीचे आधीचे आमदार गोपाळ शेट्टी देखील उपस्थित होते. या शिवाय बोरिवलीतील भाजपचे नगरसेवकही आवर्जून या विजयी यात्रेत सहभागी झाले होते. सुवासिनींनी तावडे यांचे औंक्षण केले. त्यानंतर तावडे यांनी मतमोजणी सुरू असलेली पालिकेची शाळा गाठली. विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारून तावडे पुन्हा विजयरथावर आरूढ झाले. संपूर्ण शिंपोलीचा रस्ता भाजपच्या कार्यकर्त्यांनी भरून गेला होता. या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी जे काम करून ठेवले आहे त्याचा मला फायदा होईल, हे माहीत होते. त्यामुळे, बोरिवलीतून विजयाची खात्री होती, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी विजयानंतर व्यक्त केली.
पराभवापेक्षाही विजयाचा धक्का
भायखळा
भायखळ्यात मुख्य चर्चा होती भाजपचे मधु चव्हाण, काँग्रेसचे मधुकर चव्हाण अ. भा. सेनेच्या गीता गवळी यांच्याच नावांची. मनसेच्या संजय नाईकांचेही नाव अधूनमधून येत होते. परंतु अनपेक्षितपणे ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहदुल मुस्लिमीन’ (एआयएमइआयएम) या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाच्या अॅड्. वारिस युसुफ पठाण यांनी मुसंडी मारली आणि थेट विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. कोणी बोलून दाखवत नव्हते परंतु अन्य सगळ्यांनाच आपल्या पराभवापेक्षाही पठाण यांच्या विजयानेच धक्का बसल्याचे जाणवत होते.
आग्रीपाडा म्युनिसिपल मराठी शाळेच्या परिसरात अ. भा. सेनेचे कार्यकर्ते ७.०० वाजल्यापासूनच जमले होते. भायखळ्याचा गड आपलाच, इथे बोलबाला आपलाच अशाच अविर्भावात पक्षाचे आणि गीता गवळी यांचे समर्थक या परिसरात दाखल होते. भाजप, काँग्रेस, मनसे आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांची मात्र म्हणावी तशी येथे हजेरी नव्हती. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत भाजपच्या मधु चव्हाणांनी आघाडी घेतली. मात्र तिसऱ्या फेरीत मनसेच्या संजय नाईक यांनी आघाडी घेतली. त्यामुळे गीता गवळी समर्थकांमध्ये काहीशी निराशा पसरली. परंतु पाचव्या फेरीत त्यांना अपेक्षित निकाल पुढे आला. तोपर्यंत तिसऱ्या क्रमाकावर असलेल्या गीता गवळी यांनी मुसंडी मारत भाजपच्या चव्हाण यांना पिछाडीवर टाकले आणि त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला. त्या नाईक यांच्यापेक्षा काहीच मतांनी पिछाडीवर आहे आणि लवकरच त्यांना मागे टाकतील अशी ‘एक्स्लुझिव्ह’ माहिती फोनवरून दिली जाऊ लागली. सातव्या फेरीत त्यांनी नाईक यांना मागे टाकत आघाडी घेतली. १० व्या फेरीपर्यंत या तिघांमध्येच चढाओढ होती. काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांना या तिघांनी पहिल्या तीनमध्ये येण्याची संधीच दिली नाही. परंतु १०व्या फेरीत पठाण यांनी ३ हजार मते मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला आणि दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. याच फेरीत गवळी आणि पठाण यांच्यातील मतांचा फरक घटला व ११व्या फेरीत पठाण यांनी गवळी यांच्यावर कुरघोडी करीत आघाडी घेतली. १२व्या फेरीपर्यंत पठाण, गवळी, नाईक अशी चुरस सुरू होती. मात्र १३व्या फेरीत भाजपच्या चव्हाण यांनी पुन्हा एकदा आघाडी घेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. १४ व्या फेरीत पुन्हा पठाण यांनी आघाडी घेत १८ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि त्यानंतर मतमोजणीत थेट चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या गीता गवळी समर्थकांमध्ये निराशा पसरली आणि निकाल जाहीर होण्यापूर्वीच रिकाम्या हाती ते परतू लागले.
.. अखेर गड आला!
दादर
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माहीम-दादर परिसरात मनसेने शिवसेनेचे नामोनिशाण मिटवले होते. त्यामुळे या वेळी माहिम मतदार संघात पुन्हा एकदा सेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती. या मेहनतीचे चीज होईल की नाही ही शंका त्यांच्या मनात होती. अन्यत्र कुठेही कितीही जागा मिळाल्या नाही मिळाल्या तरी हा गड परत आपल्याकडे आला पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. आठ वाजता मतमोजणी सुरू झाली आणि परिसरात एकदम शांतता पसरली. शाळेच्या दुसऱ्या बाजूला मनसैनिकांची गर्दी होती. मध्ये पोलिसांचा ताफा होता. पहिल्या फेरीचे निकाल जाहीर झाले आणि सेनेच्या कंपूत तणाव वाढला. नितीन सरदेसाई आघाडीवर होते. पुढच्या आठ फेऱ्यांमध्येही चित्र काही बदलले नाही. स्वाभाविकच ‘मनसे जोरात तर शिवसेना कोमात’ अशी स्थिती होती. नवव्या फेरीपर्यंत ही स्थिती कायम राहिल्याने शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली. भाजपचेही आकडे वाढत होते. त्यामुळे युती केली असती तर एव्हाना आपण विजयी मिरवणूकही सुरू केली असती, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली. दुसरीकडे पुन्हा सरदेसाईच निवडून येताहेत म्हणून मनसैनिक खुशीत होते. पण साडेअकराच्या सुमारास दहाव्या फेरीचे निकाल आले आणि सरदेसाई यांची दोन हजार मतांची आघाडी ३०० मतांनी कमी झाली. अकराव्या आणि बाराच्या फेरीतही मनसेची आघाडी कमी कमी होत तेराव्या फेरीत शिवसेना पुढे आली आणि परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. ‘आवाज कुणाचा? शिवसेनेचा..!’ अशा घोषणा फुटू लागल्या. पंधराव्या फेरीपर्यंत चित्र स्पष्ट झाल्यानंतर सदा सरवणकर या परिसरात दाखल झाले. त्यावेळेस ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या पुढे ‘बाळासाहेबांचे स्वप्न साकारले!’ असा संदेश असलेला फलकही झळकविण्यात आला. पाठोपाठ दादर परिसर भगवा झाला. राज्यात किती जागा येतात याहीपेक्षा गड आला याचेच कार्यकर्त्यांना समाधान होते.
महिलांनी धडा शिकवला!
दहिसर
शिवसेनेत महिलांचा मान राखला जातो असे मोठय़ा आवाजात सांगितले जात असले तरी सेनेच्या महिला नगरसेविकांचीच कशी कुचंबणा होते आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतरही दाद कशी मिळत नाही याचे उदाहरण म्हणजे दहिसरमधील सेनानेते विनोद घोसाळकर यांच्याविरुद्ध माजी महापौर शुभा राऊळ, आणि शीतल म्हात्रे (शिवसेना) व भाजपच्या मनिषा चौधरी यांचे झालेले भांडण. निवडणुकीतही या भांडणाचे प्रतिबिंब उमटले होते आणि मतमोजणीतही ते पुरेपूर उतरले होते. राऊळ आणि चौधरी यांच्या जोडीला काँग्रेसच्या शीतल म्हात्रे या तीन महिला उमेदवारांनी नियोजनबद्धपणे शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांची कोंडी करीत त्यांना पराभवाचे अस्मान दाखवले. घोसाळकर यांच्यासारख्या शिवसेनेच्या तगडय़ा उमेदवाराशी सामना असल्याने त्याचा फायदा विरोधातील तीन महिलांपैकी नेमका कुणाला होईल, हाच इथला उत्सुकतेचा प्रश्न होता. त्यामुळे, निकालाच्या दिवशीही १५व्या फेरीपर्यंत उमेदवारांपैकी कुणीही मतमोजणीच्या ठिकाणी फिरकले नाही. पण, १५व्या फेरीला विजय दृष्टीपथात आल्यानंतर भाजपच्या मनिषा चौधरी यांनी मतमोजणीचे केंद्र गाठले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश आला. चौधरी यांना मिरवणूक काढूनच केंद्रावर नेण्यात आले. हा विजय मला मतदान करणाऱ्या महिलांचा आहे, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी व्यक्त केली. तसेच, नकारात्मक प्रचार करण्याऐवजी माझा भर नेहमी विकासावर राहिला. त्यालाच यापुढेही आपण प्राधान्य देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दहिसरच्या पराभवाची कसर भरून निघाली!
मागाठणे
बाजूच्याच मागाठाण्यात मात्र निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे घडय़ाळ सोडून सेनेचे धनुष्यबाण खांद्यावर घेणारे प्रकाश सुर्वे यांनी हा मतदारसंघ मनसेकडून सेनेकडे खेचण्यात यश मिळविले. दहिसरमधील पराभवाची कसर येथे भरून निघाल्याने येथे शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. सुरुवातीपासूनच सुर्वे आघाडीवर होते. मनसेचे विद्ममान आमदार प्रवीण दरेकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्याने येथेही खरी चुरस सेना विरुद्ध भाजप अशीच होती. शिवसैनिक मोटसायकल, रिक्षा यांना भगवे झेंडे, गळ्यात पक्षाच्या पट्टय़ा मिरवित कार्यकर्ते मतमोजणी सुरू असलेल्या अभिनव नगरमध्ये जमले होते. कार्यकर्त्यांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसा इथला पोलिस बंदोबस्तही वाढत गेला. सुर्वे येणार म्हणून पुष्पगुच्छ, फटाक्यांच्या लांबच लांब माळा, ढोलताशे अशा जय्यत तयारीने शिवसैनिक येथे जमले होते. एकच्या सुमारास सुर्वे आल्यानंतर ‘आला रे आला, सेनेचा वाघ आला,’ अशा घोषणांनी शिवसैनिकांनी वातावरण दणाणून सोडले.
पहिल्याच प्रयत्नात फत्ते!
गोरेगाव
एकेकाळी समाजवाद्यांना कडवी लढत देणाऱ्या जनसंघ/ भाजपाच्या हातून युती झाल्यानंतर गोरेगाव निसटलेच होते. सलग २५ वर्षे पालिका ते लोकसभा कोणतीच निवडणूक न लढवल्याने कार्यकर्तेही फारसे राहिले नव्हते. अशात अचानक युती तुटून भाजपाचा उमेदवार घोषित झाल्याने अनेक जुने कार्यकर्ते तातडीने पक्षकार्यालयात दाखल झाले होते. आता कमळ फुलवायचेच, अशा निर्धाराने ते कामाला लागले होते. तोच उत्साह आणि जोश मतमोजणीच्या काळात दिसत होता. सुभाष देसाईसारखा दिग्गज उमेदवार असूनही जवळपास प्रत्येक फेरीमध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर सतत मताधिक्य राखून होत्या. मताधिक्य कमी-जास्त होत होते. परंतु देसाईंना आघाडी मिळत नव्हती. त्यामुळे अस्वस्थ झालेले शिवसैनिक गुमसुम होते तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. विद्या ठाकूर यांचे सुरुवातीचे दोन- अडीच हजारांचे मताधिक्य १० हजारांवर गेले. परंतु नंतर सुभाष देसाई यांनी पुन्हा जोर मारला आणि दोघांमधील मतांचा फरक कमीकमी होऊ लागला. परंतु तोपर्यंत २० हून अधिक फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.
उरलेल्या फेऱ्यांमध्ये हा फरक संपवून आघाडी मिळवण्याची शक्यता जवळपास मावळली होती. अखेर निकाल घोषित होण्याआधीच सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. सुभाष देसाईंचा किल्ला त्यांचे कार्यकर्ते लढवत होते तर विद्या ठाकूर यांच्या वतीने त्यांचे पती जयप्रकाश ठाकूर सूत्रे सांभाळत होते.
तीनच्या सुमारास अधिकृत निकाल घोषित झाला आणि पुन्हा एकदा भाजपाचे कमळ गोरेगावात फुलवले या समाधानाने कार्यकर्त्यांचा जल्लोष टिपेला पोहोचला. विद्या ठाकूर सलग चार वेळा महापालिकेवर निवडून आल्या होत्या. विधानसभेची त्यांची ही पहिलीच निवडणूक होती. पण पहिल्याच प्रयत्नात सुभाष देसाईंसारख्या दिग्गज सेनानेत्याला हरवून त्या ‘जायंट कीलर’ ठरल्या.
सोप्या विजयाची कठीण वाट..
दिंडोशी
काँग्रेसने जागा राखली
धारावी
एकापाठोपाठ एक फेऱ्यांचे निकाल जाहीर होऊ लागताच, दोघांचेही समर्थक टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त करीत होते. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये दोघांच्या मतांत फारसा फरक नव्हता. पण सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी वर्षां गायकवाड यांनी सोडली नाही. उलट हळूहळू वाढवत नेली आणि अखेर विजयाची मोहोर उमटवली. अखेर ११.०० च्या सुमारास शिवसेना कार्यकर्त्यांनी गुपचूप पांगायला सुरुवात केली. १२.०० वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांची तुडूंब गर्दी झाली. काँग्रेसचे झेंडे फडकू लागले. टोप्या, बॅनर्सचे वाटपही सुरू झाले. साडेबारा वाजता अंतिम निकाल आला कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि वर्षां गायकवाड यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत जल्लोषास सुरुवात केली.