कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळी भेट म्हणून १ नोव्हेंबरपासून गाय व म्हैस दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध दरवाढ देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या दूध दरवाढीचा फायदा गोकुळच्या जवळपास ५ लाख दूध उत्पादकांना होणार आहे, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, वाढती महागाई, जनावरांच्या वाढलेल्या किमती तसेच न परवडणारा पशुखाद्याचा दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी त्रासलेला असून या दरवाढीमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. १ नोव्हेंबरपासून ही दरवाढ देण्यात येणार असून याबाबतचे परिपत्रक लवकरच गोकुळच्या संलग्न प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार आहे. यावेळी गोकुळचे संचालक, संचालिका व कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर उपस्थित होते.
गोकुळची दूध दरवाढ; उत्पादकांना दिवाळी भेट
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळी भेट म्हणून १ नोव्हेंबरपासून गाय व म्हैस दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध दरवाढ देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
First published on: 29-10-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hike milk of gokul gift to manufacturers