२६ जानेवारीला राष्ट्रध्वज खरेदी करा पण त्यांचा योग्य तो मानही राखा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर ‘हिंदू जनजागृती समिती’तर्फे ‘राष्ट्रध्वजाची विटंबना रोखा’ ही चळवळ राबवण्यात येणार आहे.
या चळवळीअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरातील प्रमुख ८ चौकांमध्ये प्रबोधन कक्ष लावण्यात येणार आहेत.
फलकप्रसिद्धी, भित्तिपत्रके, हस्तपत्रकांचे वाटप यांच्या मार्फत जनजागृती केली जाणार आहे.
तसेच फेसबुक आणि ई-मेलसारख्या आधुनिक माध्यमांचाही वापर करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये तसेच राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये या उद्देशाने पोलिसांना आणि
प्रशासकीय अधिकाऱ्यांना समितीतर्फे निवेदने देण्यात आली आहेत.
२६ जानेवारीच्या संध्याकाळी आणि २७ जानेवारी रोजी समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर आणि कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणार आहेत. तसेच समितीतर्फे शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे.