तंटामुक्तीत हॅट्ट्रीकची संधी
तंटामुक्ती अभियानात सलग दोन वर्षे मराठवाडय़ात प्रथम क्रमांक पटकावून हिंगोली जिल्हय़ाने बाजी मारली. या वर्षी जिल्हय़ातील १९६ गावे तंटामुक्त जाहीर झाल्याने जिल्ह्य़ास सलग तिसऱ्यांदा मराठवाडय़ात प्रथम क्रमांक राखण्याची संधी आहे. तालुकास्तरीय पथकाकडून लवकरच या गावांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चालू वर्षी सुमारे २०० गावांचे तंटामुक्तीचे उद्दिष्ट पोलीस प्रशासनाने ठेवले होते. परंतु औंढा नागनाथ, गोरेगाव व चौंढी यांसारख्या मोठय़ा गावांत राजकीय मतभेद असल्याने पोलीस यंत्रणेला उद्दिष्टपूर्तीमध्ये पूर्ण यश मिळाले नाही. १९६ गावे तंटामुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक माणिक पेरके, राम हाके, नीलेश मोरे, सुनील लांजेवार यांनी यशस्वी परिश्रम घेतल्याने मराठवाडय़ातून हिंगोलीला तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळणार, असेच चित्र आहे.
हिंगोलीमधील १९६ गावे तंटामुक्त
तंटामुक्तीत हॅट्ट्रीकची संधी तंटामुक्ती अभियानात सलग दोन वर्षे मराठवाडय़ात प्रथम क्रमांक पटकावून हिंगोली जिल्हय़ाने बाजी मारली. या वर्षी जिल्हय़ातील १९६ गावे तंटामुक्त जाहीर झाल्याने जिल्ह्य़ास सलग तिसऱ्यांदा मराठवाडय़ात प्रथम
First published on: 14-05-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hingoli 196 villages dispute free