स्नेहांकीत या अग्रगण्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने हिराई संगीत महोत्सवाचे आयोजन येत्या १९ व २० जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या स्वरोत्सवात बनारस, मुंबई, कोलकाता व विदर्भातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना चंद्रपूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
चंद्रपूर रसिकांनी रसिकांसाठी उभारलेला स्वरोत्सव म्हणजे राणी हिराई संगीत महोत्सव या जिल्ह्य़ातील संगीत क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांनाही पर्वणीच ठरणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात १९ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता सर्वप्रथम बनारस विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. रिचा कुमार या आपले गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर व संवादिनीवर किसन रामदोहकर, बनारस व नरेंद्र माहुलकर साथ करणार आहेत. या सत्राच्या दुसऱ्या भागात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्हायोलिनवादक कलारामनाथ आपले वादन सादर करतील. त्यांना तबल्यावर साथ मुंबईचे आदिल्य कल्याणपूर करतील.  रविवार २० जानेवारी रोजी तृतीय सत्रात सकाळी १० वाजता पंडित जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी आपले गायन सादर करतील. त्यांना तबल्यावर साथ श्री प्रसाद कळंबेरकर, संवादिनीवर साथ अनंता जोशी करतील.
हे दोन्ही कलावंत मुंबईचे आहेत. याच सत्राच्या दुसऱ्या भागात सांगितीक जगतात अतिशय जोमाने समोर येणारे तरुण गायक झिशान खान आपले गायन सादर करतील. त्यांना तबल्यावर साथ नवाब हुसेन व संवादिनीवर साथ झोएब हुसेन खान करतील.
रविवारी सायंकाळी याच कार्यक्रमात ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व चंद्रपूरचे सुपूत्र ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना चंद्रपूर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्यानंतर हुबळी येथील ख्यातकीर्त गायक जयतीर्थ मेहुंदी आपले गायन सादर करतील. त्यांना तबल्यावर साथ नागपूरचे संदेश पोपटकर व संवादिनीवर अनंत जोशी करतील. चंद्रपूरकर रसिकांनी या निशुल्क संगीत महोत्सवाचा आनंद घ्यावा व कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन स्नेहांकितने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा