चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या फौजांनी किल्ले वसई सर केला त्याला २७५ वर्ष पूर्ण होत आहेत़ त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी १७ ते २१ मेदरम्यान वसई-विरार महापालिकेकडून ‘वसई विजय दिन’ साजरा करण्यात येत आह़े या विजय दिनाच्या औचित्याने वसईतील एका ‘नाणावलेल्या’ अवलियाची ओळख़ चिमाजी आप्पांनी २७५ वर्षांपूर्वी वसई सर केल्यानंतर येथील कारभाराची घडीही सुव्यवस्थित बसविली होती़ त्यांची साक्ष देणारी अनेक कागदपत्रे आज पेशवे दफ्तरात सापडतात़ परंतु, या कागदपत्रांबरोबरच ठिकठिकाणी विखुरलेली वसई मोहिमेतील नाणीसुद्धा या कारभारावर प्रकाश टाकतात़ अशीच काही नाणी वसईतील एका अवलियाने संकलित केली आहेत़ या नाण्यांच्या माध्यमातून त्याने वसईचा इतिहासच जतन करून ठेवला आह़े जिज्ञासू अभ्यासकांना ती वेळोवेळी उपलब्धही करून देण्यात येतात़
पास्कल रॉकी लोपीस या मध्यमवयीन संगणक अभियंत्याच्या संग्रहात चिमाजी आप्पांनी वसई माहिमेच्या वेळी पाडलेली अत्यंत दुर्मीळ नाणी आहेत़ शिवकाळानंतर मराठा राजवटी सर्रास उर्दु- फारसीतूनच नाणी पाडली गेली़ मात्र या पद्धतीला छेद देत चिमाजी आप्पांनी वसई सर केल्यानंतर पुन्हा मराठीत नाणी पाडली़ ही नाणी पास्कल यांनी मिळविली आहेत़ आज त्यांच्या संग्रहात साष्टीची(वसई) सुमारे ३० ते ३५ नाणी आहेत़ पेशव्यांआधी येथे राज्य करणाऱ्या पोर्तुगिजांनी पाडलेली काही नाणी पेशव्यांनी ताब्यात घेतली आणि त्यावर स्वत:चा शिक्का उमटवून ती पुन्हा वापरात आणली़ अशी दोन्ही राजवटींचे शिक्के असणारीही काही नाणी पास्कल यांच्या संग्रहात आहेत़
केवळ मराठाकालीनच नव्हे तर त्याआधीच्या पोर्तुगिज आणि त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीतील नाणीसुद्धा पास्कलने जमविली आहेत़ तसेच या मध्ययुगीत नाण्यांसोबतच वसईशी संबंधित प्राचीन म्हणजेच शिलाहार आणि सातवाहन कालीन काही नाणीसुद्धा त्याच्या संग्रहात आहेत़ सातवाहन राजा कान्हा याचे अत्यंत दुर्मीळ नाणेही त्यांना सापडले आहेत़ हे आतापर्यंत उपलब्ध झालेले एकमेव नाणे असल्याचा पास्कल यांचा दावा आह़े त्यांच्याकडे सध्या विविध काळातील सुमारे हजार नाणी आहेत़
पास्कल यांना नववीत असताना पहिल्यांदा एक दुर्मीळ नाणे सापडल़े ते त्यांनी जपून ठेवल़े त्यांच्या वडिलांना मुलाची ही आवड लक्षात आली आणि त्यांनीही पास्कल यांना अधिक नाण्यांचा संग्रह करण्यासाठी प्रोत्साहन दिल़े कार्यालयाशेजारच्या पानवाल्याकडे त्यांना काही दुर्मीळ नाणी दिसली, ती त्यांनी पास्कलला आणून दिली़ खादी भंडारमध्ये लागणाऱ्या प्रदर्शनातून काही ब्रिटिश नाणी खरेदी करून दिली़ त्यामुळे पास्कल यांची आवड छंदात बदलली़ त्यानंतर त्यांनी वसई संपर्क वाढवून मिळतील त्याच्याकडून पदरमोड करून नाणी खरेदी केली़ या नाण्यांचा शास्त्रोक्त अभ्यास करता यावा, यासाठी संगणक अभियंता असलेला हा अवलिया सध्या मुंबई विद्यापीठातून नाणेशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आह़े
वसईतील ऐतिहासिक ‘नाणी’संग्राहक
चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या फौजांनी किल्ले वसई सर केला त्याला २७५ वर्ष पूर्ण होत आहेत़ त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी १७ ते २१ मेदरम्यान वसई-विरार महापालिकेकडून ‘वसई विजय दिन’ साजरा करण्यात येत आह़े
First published on: 21-05-2014 at 06:44 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historic coins collector from vasai