कृष्णा नदीतून सन १९९९ मध्ये येथील मंगळवार पेठेतील युवकांना सापडलेला सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा साडेआठ फूट लांबीचा व पाच फूट रुंदीचा भरीव लोखंडी, भव्य नांगर चोरीस गेल्याची घटना घडली. त्या संदर्भात कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदर अवजड नांगरावर १८५५ असे साल कोरण्यात आले होते. त्यावर ब्रिटिश सरकारची काही मुद्राही छापील स्वरूपात होती. तो नांगर ऐतिहासिक असल्याची नोंद पुरातत्त्व खात्यानेही घेतली होती. येथील युवकांनी १४ वर्षांपासून जतन केलेला हा नांगर येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात ठेवण्यात आला होता. तो चोरटय़ांनी लंपास केला. यापूर्वी तीन वेळा त्याच्या चोरीचा प्रयत्न झाला होता. युवकांच्या प्रसंगावधानाने तो अपयशी ठरल्याचे वृत्त आहे.
कराडमधील ऐतिहासिक नांगर चोरीस
कृष्णा नदीतून सन १९९९ मध्ये येथील मंगळवार पेठेतील युवकांना सापडलेला सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा साडेआठ फूट लांबीचा व पाच फूट रुंदीचा भरीव लोखंडी, भव्य नांगर चोरीस गेल्याची घटना घडली.
First published on: 04-05-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical plough stolen in karad