चाकणचा किल्ला लढवताना मराठी सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाचे दर्शन यंदा इतिहास प्रेमी मंडळातर्फे किल्ला प्रतिकृतीच्या माध्यमातून घडवले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी सकाळी दहा वाजता होईल.
इतिहास प्रेमी मंडळातर्फे दिवाळी किल्ल्याच्या निमित्ताने एका युद्धकथेची ओळख करून देण्याचा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. मराठी सैन्यातील अवघ्या चारशे वीरांनी मोगलांच्या वीस हजार फौजेच्या विरुद्ध चाकणचा किल्ला तब्बल छपन्न दिवस लढवला होता. मराठय़ांनी गाजवलेल्या या पराक्रमाचे दर्शन घडविण्यासाठी यंदा इतिहास प्रेमी मंडळातर्फे चाकणच्या संग्रामाचा इतिहास या विषयावरील किल्ला करण्यात आला आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमातून या लढाईचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.
या किल्ल्याचे उद्घाटन निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता केले जाणार आहे. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या सभागृहात हा किल्ला करण्यात आला असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आणि इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. हा किल्ला व प्रदर्शन २० नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार असून सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत ते पाहता येईल.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा