भगवानगडावरील कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, युवराज संभाजीराजे भोसले, महादेव जानकर, प्रवीण गायकवाड व गोविंद घोळवे यांनी ‘मुंडे मुख्यमंत्री व्हावेत,’ असा सूर आळवताना राजकीय टोलेबाजी केली. विविध पक्ष-संघटनांच्या प्रमुखांनी मुंडेंना जाहीर पािठबा देत धार्मिक कार्यक्रमातून राजकीय अभंगाची नवी चाल धरल्याचे स्पष्ट झाले.
बीड-नगर जिल्हय़ांच्या हद्दीवरील श्रीक्षेत्र भगवानगडावर शुक्रवारी संत भगवानबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला. गडावरूनच खासदार मुंडे गेली अनेक वष्रे राजकीय धोरण जाहीर करीत आहेत. त्यामुळे या गडाला राजकीय महत्त्वही आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडावरील धार्मिक कार्यक्रमाला विविध पक्ष-संघटनांच्या नेत्यांनी उपस्थिती लावून राजकीय अभंगाचीच चाल धरली. घोळवे यांनी मुंडे व्यक्ती नसून शक्ती आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री होतील, असे सांगून छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांना युतीच्याच काळात मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे शाहूमहाराजांच्या गादीचे वारसदार संभाजीराजे भोसले यांना न मागता लाल दिवा जाणार आहे, असे म्हटले. त्यावर भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करताना राज्यात मुंडे यांच्यातच राजकीय बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचा दावा केला. भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनीही िहमत दाखवतात तेच सत्तेत बसतात. मुंडेंनी िहमत दाखवल्यास ते सत्तेत जातील, असे म्हटले. नेत्यांच्या जाहीर भूमिकांनी गडावरून नव्या राजकीय अभंगाची चाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा