मराठवाडयाच्या हद्दीत नियमबाहय पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या हिवरी साठवण तलावामुळे विदर्भातील चुनापिंप्री धरणावर अवकळा आली आहे. सूर नदीवर निर्माणाधीन असलेल्या या तलावामुळे चुनापिंप्री धरणात पाण्याचा थेंबदेखील आला नाही. हिवाळयाच्या सुरूवातीलाच चुना पिंप्री धरण कोरडे पडल्याने परिसरातील फळबागा सुकू लागल्या आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खालावत असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
धामणगाव बढे शहरासह खंडवा, ब्राम्हंदा, देऊळगाव गुजरी, तोरनाळा, पळसखेड काकर यासह इतर गावातील कायमस्वरूपी पाणीटंचाई संपुष्टात यावी. तसेच सिंचनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा विकास व्हावा, या हेतूने सन १९८३ मध्ये १६ क ोटी ६८ लाख रूपये खर्च करून सूर नदीवर विदर्भाच्या हद्दीत चुनापिंप्री धरणाची निर्मिती करण्यात आली.
या धरणातून अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वीच बुलढाणा, अकोला व अमरावती पाटबंधारे महामंडळाचा आक्षेप असताना देखील मराठवाडा पाटबंधारे विभागाने तापी खोरे पाटबंधारे विभागाची हातमिळवणी करून हेकेखोरपणाने सूर नदीवरच धरणाच्या एका किलोमीटर परिसरात नवीन हिवरी साठवण तलावाचे काम सुरू केले आहे. या तलावाच्या भिंतीमुळे सुर नदीतील  पाणी चुनापिंप्री धरणात येणे पुर्णत: बंद झाले आहे. मराठवाडयातील हिवरी साठवण तलावामुळे विदर्भातील चुनापिंप्री धरणावर शेवटची घटका मोजण्याची वेळ आली आहे. या धरणात सूर नदीतील पाण्याचा येवाच बंद झाल्याने हे धरण कोरडेठाक पडले आहे. ऐन हिवाळयात धरण कोरडेठाक  पडल्याने परिसरातील अनेकांच्या फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत.
यावर्षी धरणात पाणीच नसल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात सुध्दा कमालीची घट झाली आहे. धरणातील पाण्याच्या भरवशावर येथील श्ेातकरी दादामिर्या मुनाफ पटेल यांनी एक ते दीड एकरात पपईची लागवड केली. हजारो रूपये खर्च करून फळ बागेची मशागत केली. परंतु, पपईला फळ धारण हेात नाही तोच त्यांच्या विहिरीतील पाणी आटले. धरण कोरडेठाक पडल्याने व पाण्याची दुसरीच कुठलीच व्यवस्था नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिवरी साठवण तलावाने हिसकावून घेतला आहे. धरणात पाणी नसल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतक ऱ्यांना शेती  पडला आहे.
अशीच परिस्थिती धरण परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्या अभावी अनेक शेतकऱ्यांनी रब्बीकडे पाठ फिरविली आहे. धरणात पाण्याचा थेंब नसल्याने अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. परिणामी धरणावर केलेला १६ क ोटी रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. धरणावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांना भविष्यात भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.      

Story img Loader