नांदेड व लातूरच्या भांडणात नेहमीच परभणीची गळचेपी झाली आहे. संघर्षांशिवाय परभणीला काहीही मिळाले नाही. अशा स्थितीत लातूरकरांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडपर्यंत सुरू करावी, अशी मागणी गुरुवारी येथे धरणे आंदोलनात करण्यात आली.
परभणी जिल्हा पत्रकार संघ व मराठवाडा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे प्रश्नावर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. विविध राजकीय-सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही मोठय़ा संख्येने हजर होते.
महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार हेमराज जैन, आर. डी. देशमुख, नितीन धूत, सुरेश नाईकवाडे, आसाराम लोमटे, हेमंत कौसडीकर, सतीश जोशी, अशोक सोनी, भगवान वाघमारे, बाळासाहेब जाधव, बालाजी मुंढे, लक्ष्मणराव गोळेगावकर, डॉ. शिवाजी दळणर, संतोष बोबडे आदींसह व्यापारी महासंघ, मराठवाडा जनता परिषद, वकील महासंघ आदी संघटनांचेही पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा