घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गाला लावणाऱ्या नऊ मातांचा डोंबिवलीतील आई महोत्सवात सन्मान करण्यात आला. नऊ मातांना दिवंगत रिटा पॉल या स्मरणार्थ सन्मानित करण्यात आले. अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात आशा वेलणकर, प्रमिला बोरसे, कल्पना म्हात्रे, कुसुम कुलकर्णी, आशा राऊत, लिलावत वाघमारे, डॉ. अंजली आपटे, जैनाबी शेख, जनाबाई वाघमारे या नऊ मातांना डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. अरूण पाटील, डॉ. विनायक किणी, डॉमनिक, जॉन, पॉल पेरापिल्ली, राहूल बोस, वसंत भगत उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा