विद्युत देयके भरली नाही म्हणून राज्यातील २५ टक्के पाणीपुरवठा योजना बंद झाल्या आहेत. पाणीपट्टीची जमा रक्कम व खर्च यांचा मेळ घालून आणि पाण्याची गळती थांबवून योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायतींनी केले तरच गावातील पाणी पुरवठा योजना व्यवस्थित सुरू राहून गावकऱ्यांना पाणी मिळेल, परंतु यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.
राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे ८६ लाख रुपये किमतीच्या बेघर वस्ती, पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री रणजित कांबळे यांचे हस्ते झाला. याप्रसंगी पालकमंत्री संजय देवतळे, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, सुभाष गौर, नंदू नागरकर, नंदा अल्लुरवार, दादा लांडे, सुनिता लोढिया, दिलीप नलगे, शिवा राव, अधीक्षक अभियंता जगतारे, कार्यकारी अधिकारी वाघ, स्वामी येरोलवार, अरुण धोटे, सुनील देशपांडे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री संजय देवतळे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेसाठी आणि विशेषत: महिलांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणात होत असल्याने पाणी जिरवण्याची योजना ग्रामपंचायतीने आखायला हवी, असे ते म्हणाले, तर आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा व कोरपना तालुक्यातील फ्लोराईडग्रस्त गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नियोजना करण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सर्वानंद वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन भास्कर चौधरी यांनी केले तर आभार आनंद करमनकर यांनी मानले.
कार्यक्रमाला अशोक देशपांडे, सुनील लभाणे, सुनील कोडापे, प्रफुल्ल चौधरी, कविता उपरे, अविनाश टेकाम, भारती पाल, अर्चना नैताम, सखावत अली, निर्मला कुळमेथे उपस्थित होते.
राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राजुरा ग्रामीण रुग्णालयात भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनी केले.
नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करून दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद खंडाते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा