होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी शिवाजी पुतळ्याजवळ रास्ता रोको केला. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या २५ डॉक्टरांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यानंतरही आंदोलनकर्त्यां डॉक्टरांचे साखळी उपोषण सुरू होते.
होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारून साखळी उपोषण सुरू केले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास साखळी उपोषणाच्या ठिकाणावरून उठून डॉक्टर रस्त्यावर आले. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती. नवा मोंढा पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या डॉक्टरांना ताब्यात घेऊन अटक केली.
रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून डॉक्टरांना अटक केली व त्यांच्यावर गंभीर प्रकारचे खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा