वरिष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळ्या विविध क्लृप्त्या लढवत असतात. अशीच आणखी एक नवीन पद्धत समोर आली आहे. या टोळ्यांतील महिलांना या ज्येष्ठ नागरिकांशी लगट करून त्यांना लुबाडतात. अशा वाढत्या घटनांनी पोलीस हैराण झाले आहेत. लाजेखातर अशा घटनांची तक्रार कुणी करीत नव्हते. मात्र शुक्रवारी एका वरिष्ठ नागरिकाने धाडसाने पुढे येऊन या हनी ट्रॅपबाबतची तक्रार दिली आहे.
कृष्णकांत जोशी (७०) (नाव बदललेले) हे प्रतिष्ठित नागरिक असून केंद्र सरकारच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते पत्नी, मुले आणि नातवंडांसह कांदिवलीत राहतात. मार्च महिन्यात ते मासे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक महिला त्यांच्या जवळ आली. आपण एकत्र मासे खरेदी करू, म्हणजे दोघांनाही स्वस्त पडतील, असे सांगत तिने त्यांच्याशी ओळख केली आणि त्यांनी एकत्र मासे खरेदी केले. ही महिला ४० ते ४५ वर्ष वयोगटातील होती. तिने काहीसे उत्तेजक असे कपडे घातले होते, असे जोशी यांनी सांगितले.
थोडय़ावेळाने तिने बाजारातच त्यांच्याशी लगट करत मधाळ बोलणे सुरू केले. बोलणे वाढवत तिने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानतर या महिलेलेने जोशी यांना जवळच्या एका इमारतीत नेले. येथे माझे एक नातेवाईक राहतात, त्यांचे घर रिकामेच आहे, असे त्यांना सांगितले. ती पडीक इमारत होती. त्याच्या पहिल्या मजल्यावरील मोकळ्या आणि अंधाऱ्या जागेत या महिलेने जोशी यांना नेले आणि तेथेच त्यांच्याशी लगट करायला सुरवात केली. जोशी यांना त्यावेळी भान राहिले नाही. थोडय़ा वेळाने ते जायला निघाले. ती महिला घाईघाईत रिक्षात बसून निघून गेली. नंतर आपल्या गळ्यातील सोनसाखळी गायब झाल्याचे जोशी यांच्या लक्षात आले. त्या महिलेने लुटण्यासाठी ही खेळी खेळली होती.
जोशी यांनी त्वरीत कांदिवली पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यावेळी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. लाजेखातर जोशी यांनी त्याचा पाठपुरावा केला नव्हता. परंतु आता अशा घटना वाढत असून इतरांनी सावध व्हावे म्हणून त्यांनी पुन्हा कांदिवली पोलीस ठाणे गाठले आहे. शुक्रवारी याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे.
माझ्याकडून भावनेच्या भरात चूक झाली. पण इतरांनी अशा मोहाला बळी पडू नये आणि सावध राहावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे. ही महिला हिंदीत बोलत होती. ज्या प्रकारे ती वावरत होती आणि जोशी यांना तिने जिथे नेले ते पाहता ती सराईत होती आणि अशाप्रकारे तिने अनेकांना गंडविले असण्याची शक्यता आहे. मात्र बदनामीच्या भीतीने कुणी पुढे येत नसावे, असेही जोशी म्हणाले.
याबाबत बोलताना कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिपत पांढरमिशे यांनी सांगितले की, वरिष्ठ नागरिकांना लुबाडण्यासाठी महिलांना पुढे करण्याची ही नवीन पद्धत सुरू झाली आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करून त्या महिलेचा शोध घेऊ, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेने अशाच पद्धतीने एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे पांढरमिशे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठांना लुबाडण्याच्या काही पद्धती
वरिष्ठ नागरिकांच्या असहाय्यतेचा आणि त्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत. सकाळ- संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला बाहेर पडतात. त्यांना या टोळीतील माणसे एकटे गाठतात. आम्ही पोलीस आहोत, पुढे दरोडा पडलाय. तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगून हातचलाखीने त्यांचे दागिने लंपास करतात. अर्थात ही जुनी पद्धत आहे. पण आजही अनेक ज्येष्ठ नागरिक या प्रकाराला बळी पडतात. दुपारी महिला घरी एकटय़ा असतात. त्यांना सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून खरे दागिने घेऊन हातचलाखीने ते बदलून खोटे दागिने दिले जातात. वरिष्ठ नागरिकांनी शक्यतो एकटय़ाने सोन्याचे दागिने घालून बाहेर पडू नये, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन
असा काही प्रसंग आला तर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा ज्येष्ठ नागरिक, मुले आणि महिलांसाठी असलेल्या १०३ क्रमांकावर संपर्क साधता येईल