नाशिक बार असोसिएशनच्या २०१३मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचितांचा सत्कार एनएसके यूथ फाऊंडेशनच्या वतीने येथील मायबोली वाचनालयाच्या सभागृहात झाला.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे कार्यकारी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, पालिका गटनेते अजय बोरस्ते उपस्थित होते. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली.
महिला वकिलांच्या स्वच्छतागृहाचा गहन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाज व्यवस्थेत वकिलांचे असलेले महत्त्व मिर्लेकर यांनी समजावून सांगितले.
याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ठाकरे यांसह उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, सचिव सुरेश निफाडे, सहसचिव जालिंदर ताडगे, महिला सहसचिव मंगला शेजवळ, खजिनदार हेमंत गायकवाड आदींचा सत्कार मिर्लेकर, अॅड. जायभावे यांच्या हस्ते ‘फटकारे’ हे बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्र पुस्तक देऊन केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा