नाशिक जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघ आयोजित आणि विद्यावर्धन आयडिया आर्किटेक्ट कॉलेज प्रायोजित चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्कृष्ठ ठरलेल्या प्रत्येक गटातील १२५ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या १२ कलाशिक्षकांचा तसेच ११ मुख्याध्यापकांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर आर. एस. लथ शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्ष शर्वरी लथ, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष मल्लिकार्जून सिंदगी, कार्यवाह शालिग्राम भिरुड, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष द. वा. मुळे, विवेक पाटणकर, शैक्षणिक कला संघाचे हेमंत देवनपल्ली, उपाध्यक्ष कामिनी पवार उपस्थित होते.
जिल्ह्य़ातून विविध शाळांचे १२ हजार विद्यार्थ्यांनी चित्रकला व रंगभरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. याप्रसंगी शर्वरी लथ, शिक्षणाधिकारी औताडे, पाटणकर, मुळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व सहभागी शाळांतील इयत्ता सातवी ते दहावीच्या गटातून प्रत्येक विद्यालयातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑन दी स्पॉट’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सातवी ते आठवी गटातून उंटवाडी विद्यालय (प्रथम), फ्रावशी अकादमी (व्दितीय), टी. एस. दिघोळे विद्यालय इगपुरी (तृतीय) तर नववी ते दहावी गटातून म. गांधी हायस्कुल इगतपुरी (प्रथम), सारडा विद्यालय सिन्नर (व्दितीय), अण्णासाहेब डाके विद्यालय नांदगाव (तृतीय) यांनी फिरत्या ढाली मिळविल्या.
कलाशिक्षक संघाच्या चित्रकला स्पर्धेत १२५ विद्यार्थ्यांचा सन्मान
नाशिक जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघ आयोजित आणि विद्यावर्धन आयडिया आर्किटेक्ट कॉलेज प्रायोजित चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्कृष्ठ ठरलेल्या प्रत्येक गटातील १२५ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 28-02-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honoring 125 winners of drawing competition