पुण्याच्या ज्योतिष प्रबोधिनी संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत नाशिक येथील ज्योतिष शास्त्री आणि द प्रिडिक्शन स्कूल ऑफ वेदिक अ‍ॅस्ट्रॉलॉजी या संस्थेचे संस्थापक किरण देशपांडे यांना ‘ज्योतिषाचार्य’ने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात वास्तुतज्ज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पंडित यांनी केले. या वेळी देशपांडे यांच्या हस्ते ज्योतिषतज्ज्ञ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्योतिषाचार्य सतीश सोनाळकर यांनी आभार मानले.
फाइल नं. २९एनएलएस०२२
शिवनाथ कडभाने यांची नियुक्ती
निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवनाथ कडभाने यांची नामको बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी अविरोध निवड झाली. ते विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असून निफाड सहकारी कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. नामको बँकेचे ते ज्येष्ठ संचालक आहेत.

Story img Loader