पर्यावरणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करतानाच वैदर्भीय सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाला नवे आयाम देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश गांधी यांच्या पासष्टीपूर्तीनिमित्त मंगळवारी, २३ जुलैला सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. गांधी यांचा सत्कार करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी व राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील उपस्थित राहतील. समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार दत्ता मेघे राहतील. समारंभाला खासदार विजय दर्डा, अजय संचेती तसेच माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभानंतर भजनकार व गझलकार अनुप जलोटा यांची भजनसंध्या रंगणार आहे. या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष रमेश बोरकुटे व संयोजक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा