संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजविज्ञान शाखेच्या अधिष्ठातापदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांचे पत्रकारिता व जनसंवाद अभ्यास मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. बबन नाखले यांनी डॉ. संतोष ठाकरे यांचे स्वागत करून या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. ठाकरे यांच्या सत्कारप्रसंगी अभ्यास मंडळाचे सदस्य राजा पोखरापुरकर, (पुणे) संजय देशमुख (अकोला), प्रा.कुमार बोबडे (अमरावती), न.मा.जोशी (यवतमाळ), पांडे (नागपूर) यांनी अधिष्ठाता डॉ. संतोष ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विद्यापीठात गटबाजीचे राजकारण न करता विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रित झाले पाहिजे आणि विद्यार्थी हितासाठीच आपण काम करू, असे प्रतिपादन या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. संतोष ठाकरे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा