केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक सुधाकर पाखले यांचा मुलगा हेमंतने उत्कृष्ट गुणांसह यश मिळविले.
त्याच्या यशाबद्दल लाडशाखीय वाणी समाज मित्र मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष सचिन बागड, डॉ. बाळकृष्ण येवलकर, भगवान खैरनार, सुभाष मुसळे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
हेमंत  मेकॅनिकल इंजिनीअर असून आई कमल यादेखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कार्यरत आहेत.
भाऊ संकेत हा पुणे येथे एमबीए करीत आहे.

Story img Loader