शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४०पेक्षा अधिक शाळांमधील एकूण ८० गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार मुलुंडमधील काँग्रेस आमदार चरणसिंग सप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच करण्यात आला. गुणवंत मुलुंडकर या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलुंडमधील ४० विद्यार्थी व ४० विद्यार्थिनींना देण्यात आला. हा पुरस्कार देण्याचे हे आठवे वर्ष        आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जनार्दन चांदोरकर हे या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. मुलुंडच्या कालिदास सभागृहात शनिवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सय्यद अयुब यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले होते. या वेळी मुलुंडमधील अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Story img Loader