‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’च्या पंचवार्षिक निवडणुकीत फेडरेशनचे विद्यमान संचालक प्रदीप सामंत यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलचे सर्व १५ उमेदवार सुमारे दोन तृतियांश मताधिक्क्याने विजयी झाले.
हाऊसिंग फेडरेशन नावारूपाला आणण्यात मोलाचे योगदान देणारे स्व. रघुवीर सामंत यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांना मानणाऱ्या. त्यांच्यासोबत काम केलेल्या कार्यकर्त्यांनी प्रदीप सामंत यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’मार्फत निवडणूक लढवली होती. तर अॅड. वडेर व अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘श्रीसमर्थ सहकार पॅनेल’ मैदानात उतरले होते. दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची लढाई होईल, असा अंदाज वर्तविला जात होता.
प्रत्यक्षात सामंत पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी सुमारे दोन तृतियांश मतांनी दणदणीत विजय मिळवला. प्रदीप सामंत यांच्यासह हरी गोरे, विनय शेर्लेकर, अनिल जाधव, दिलीप नागवेकर, एम. एस. करजगीखेड, सयाजी झेंडे, डायना मेनेझेस, बी. डी. जगताप, तानाजी यटम, ज्ञानेश्वर गोसावी, विश्वास उंबरे, छाया आजगावकर, अनुश्री माळगावकर, सारिका सावळ हे उमेदवार विजयी झाले आहेत.
स्व. सामंत यांच्या विचारांनुसार फेडरेशनच्या कामात पारदर्शकता, आधुनिकीकरण आणून गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना सोयीचे व्हावे अशा प्रकारे कामकाजात सुधारणा करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रदीप सामंत यांनी निकालानंतर व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
हाऊसिंग फेडरेशन निवडणुकीत प्रदीप सामंत पॅनेलचा विजय
‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’च्या पंचवार्षिक निवडणुकीत फेडरेशनचे विद्यमान संचालक प्रदीप सामंत यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व. रघुवीर सामंत पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवला. या पॅनेलचे सर्व १५ उमेदवार सुमारे दोन तृतियांश मताधिक्क्याने विजयी झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-06-2013 at 08:07 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Houseing fedration election pradeep samant panel wins