गेल्या १० वर्षांपासून शहरवासीयांना भूलथापा देणारे शहराचा विकास करण्याचे स्वप्न दाखवत आहेत. मात्र, विकासाला गती देण्याच्या नावावर वर्षांनुवर्षे अनियोजित बांधकामे केली जात आहेत. निरंतर सुरू असलेल्या बांधकामांमुळे शहरातील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत.
शहरातील अपघातामुळे अनेकांचा बळी, तर अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. १८ डिसेंबरला आंबेडकर चौकात झालेल्या अपघातात शहरातील नामवंत वकील विजय मेश्राम यांचा मृत्यू झाला.
या घटनेवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सत्ताधाऱ्यांनो आणखी किती जणांचा बळी घेणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
गेल्या १० वर्षांपासून शहराचा विकास करण्याचे स्वप्न दाखवले जात आहे, मात्र विकास फक्त रस्ते व पाणी टाकी बांधकाम, अशा विविध बांधकामांच्या कामातूनच केला जात आहे. ज्या कामात मलाई खाता येईल, असेच काम शहर विकासाच्या इतिहासात नोंदवले जात आहेत. प्रत्यक्षात गेल्या १० वर्षांत शहराचा किती विकास झाला आहे, हे अनुभव शहरवासी घेत आहेत. विकासाला गती देण्याच्या नावावर निरंतर बांधकामे केली जात आहे. बांधकामसंदर्भात कसलेही नियोजन केले जात नाही आणि अनियोजनबद्घ कामासंदर्भात जनप्रतिनिधीही दुर्लक्ष करतात.
परिणामी, गोंदिया शहरातील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. अशा अपघातातून किती जणांचे आणखी बळी घेणार असल्याचा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.
पोकळ विकासाच्या नावावर आणखी किती बळी घेणार?
गेल्या १० वर्षांपासून शहरवासीयांना भूलथापा देणारे शहराचा विकास करण्याचे स्वप्न दाखवत आहेत. मात्र, विकासाला गती देण्याच्या नावावर वर्षांनुवर्षे अनियोजित
First published on: 27-12-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many lives will be taken under name of development