गेल्या अनेक वर्षांपेक्षा यावेळी मुंबईत जास्त पाऊस पडला हे मुंबईकरांनाही अनुभवावरून कळले आहे. मात्र नेमका किती पाऊस पडला याचा शोध घ्यायला गेलात तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील पावसाचे प्रमाण नोंदवणाऱ्या वेधशाळेच्या संकेतस्थळावर तसेच महानगरपालिकेच्या माहितीत गल्लत दिसून येत आहे. त्याहून गंभीर म्हणजे आकडेवारीतील या फरकाबाबत या संस्था अनभिज्ञ आहेत.
मुंबई हवामानशास्त्र विभाग म्हणजे वेधशाळेकडून कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन ठिकाणी पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. १९५९ पासून दोन्ही ठिकाणी घेतलेल्या नोंदी वेधशाळेच्या ‘आयएमडी मुंबई डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर ठेवण्यात आल्या आहेत. नर्ऋत्य मोसमी पावसाच्या मुंबई रेनफॉल आर्काइव्हजवर त्या पाहता येतात. दिल्लीतील केंद्रीय वेधशाळेच्या ‘आयएमडी डॉट जीओव्ही’ या संकेतस्थळावर हायड्रोलॉजी विभागात प्रत्येक जिल्ह्य़ातील मागील पाच वर्षांतील पावसाचे प्रमाण देण्यात आले आहे. त्यावर महाराष्ट्रातील मुंबईच्या पावसाचे प्रमाण िलकवर देण्यात आले आहे.
 मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात वेधशाळेकडून घेतलेल्या माहितीनुसार कुलाबा आणि सांताक्रूझ येथील गेल्या दहा वर्षांतील जून ते सप्टेंबर या महिन्यांनुसार पावसाचे प्रमाण देण्यात आले आहे. या तीनही ठिकाणी देण्यात आलेल्या मुंबईतील पावसाच्या प्रमाणात कमालीचा फरक आहे. येथे केवळ जून आणि जुल महिन्यातील सांताक्रूझ येथील आकडेवारीतील फरक देण्यात आला आहे. प्रत्यक्षात चार महिने, कुलाबा आणि सांताक्रूझ ही दोन ठिकाणे आणि गेली पन्नास वर्षांतील आकडेवारी मिळून हा गोंधळ मोठा आहे. २००९ मध्ये पडलेल्या दुष्काळात मुंबई वेधशाळेनुसार जूनमध्ये ५१३ मिमी, पालिकेनुसार २१८ मिमी तर दिल्लीतील केंद्रीय वेधशाळेनुसार २४१ मिमी पाऊस पडला. त्याचे पुढील वर्ष २०१० मधील जूनमधील आकडेवारीत तर लक्षणीय फरक आहे. एवढेच नव्हे तर मुंबई, दिल्ली वेधशाळा आणि पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईतील सरासरी पावसाचे प्रमाणही वेगवेगळे आहे. मुंबई वेधशाळेनुसार कुलाबा येथे १९२० मिमी तर सांताक्रूझ येथे २४६० मिमी पाऊस पडतो. मुंबई पालिकेनुसार कुलाबा येथे २२२० मिमी तर सांताक्रूझ येथे २५९८ मिमी पडतो तर दिल्ली येथील वेधशाळेनुसार मुंबईत २२५८ मिमी पाऊस पडतो.
वेधशाळेकडून अधिकृतरीत्या मागवलेल्या आकडेवारीनुसार, पालिकेने पावसाचे प्रमाण प्रसिद्ध केले आहे. हवामान विभागाकडून होत असलेल्या गफलतींचा फटका मुंबईला नेहमीच बसतो, असे महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या प्रमुखांनी सांगितले. ‘वेधशाळेकडून शास्त्रीय पद्धतीनुसार माहिती गोळा करण्यात येते. गेल्या शंभर वर्षांची अचूक माहिती वेधशाळेकडे आहे. संकेतस्थळावर टाकलेली माहिती तसेच पालिकेला देण्यात आलेली माहिती यांची शहानिशा केली जाईल,’ असे मुंबई वेधशाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.   
वेधशाळेकडून शास्त्रीय पद्धतीनुसार माहिती गोळा करण्यात येते. गेल्या शंभर वर्षांची अचूक माहिती वेधशाळेकडे आहे. दिल्ली येथील केंद्रीय वेधशाळेने मुंबई जिल्ह्य़ाच्या सरासरी पावसाचे प्रमाण दिले आहे. मुंबईच्या संकेतस्थळावर टाकलेली माहिती तसेच पालिकेला देण्यात आलेली माहिती यांची शहानिशा केली जाईल, असे मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केले.  

पाऊस मिमीमध्ये  वर्ष २००८-२०१२
कुलाबा
वर्ष    मुंबई     मुंबई
जून    वेधशाळा      पालिका
२००८      ७३५.५     ९३२.८
२००९     २६५.९     २६३.८
२०१०     ४७७.६     ९४८.४
२०११     ४६१.२     ४६१.५
२०१२     १७७.४    २५४.७
जुलै
२००८       ६९०.२      ६७५.३
२००९       ७७१.३     ७४१.८
२०१०        ५७५.६     ११८२.१
२०११       १२८४.४     १३८६.६
२०१२       ३९३       ३३२.३

सांताक्रूझ
मुंबई     मुंबई    केंद्रीय
वेधशाळा      पालिका    वेधशाळा
८००.५      ९३६.१     ७६८
५१३.५    २१८.२    २४१
३९९    ७१९.४    ९४७.४
६६१.७    ६६२.६    ४६१.२
२९८.५    ६६२.६     १७६.९

९५०.२     ८०७.३     ९१०.२
१३१७.२    १११९.८    ९५६.८
९४४.२    १३२०.१    १११२.७
१३६२.५    १४२६.८    १२८४.४
६२७.९     १४२६.८     ३९२.५