मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एकूण १०६० विद्यार्थ्यांपैकी ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८६ टक्के लागला. विज्ञान शाखेतून अमोघ पाठक ५५० (९१.६६ टक्के) प्रथम, तर प्रतीक बाविस्कर (८९.६६ टक्के) द्वितीय, राजश्री भिरूड (८९.१६) तृतीय आले.
वाणिज्य विभागातून लविना पंजवाणी (८३.१६) प्रथम, नेहा पवार व सोनाली सुगंध (८२.१६) द्वितीय, तर धीरज कारडा (८१.८३) तृतीय आले. कला विभागातून शिवानी शहाणे (७१.८३) प्रथम, कोमल देशमुख (६८) द्वितीय, स्नेहल गायकवाड (६७.८३) आले. व्यावसायिक अभ्यासक्रमात इटीमधून शुभम परमसागर (७४.१७), एमआरईडीएमधून मृणाल मोहिते (७२.१२) आणि एमएलटीमधून सोनाली बिडवे ४२८ प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
सर्व शाखांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी सत्कार केला. या यशात विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत पालकांची प्रेरणा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. व्ही. पी. पगार, पर्यवेक्षक प्रा. सी. एस. गायकवाड, प्रा. संजय मिरजकर, प्रा. जयंत भाभे, प्रा. राजन माताडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
मालेगावच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल ९२ टक्के
मालेगाव कॅम्प येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल ९२ टक्के लागला असून संस्थेचे ६० टक्के विद्यार्थी हे प्रथम आणि विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. नयना भदाणे, ललित शेवाळे, वैशाली पाटील, नयना पगार, तुषार कापडणीस हे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. मालेगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल नेहमीच उत्कृष्ट लागत असतो, तसेच पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतही विद्यार्थी अग्रेसर राहत असल्याचे आतापर्यंत निकालातून स्पष्ट झाले आहे.

Story img Loader