फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी उरण तालुक्यातील एक हजार ७५० विद्यार्थी व विद्यार्थिनी बसले होते. यापैकी एक हजार ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उरणमधील १२ कनिष्ठ महाविद्यालयांचा एकूण निकाल ८२.८१ टक्के लागला आहे.
उरणमधील एन. आय. हायस्कूल ज्युनिअर महाविद्यालयाचा – ५८.१० टक्के, उरण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, उरण – ९८.६४ टक्के, तु. ह. वाजेकर फुंडे – ७८.९२ टक्के, दि. बा. पाटील ज्युनिअर महाविद्यालय, जासई – ७४.३० टक्के, कोकण एज्युकेशन सोसायटी, चिरनेर- ६५.६५ टक्के, कर्मवीर भाऊराव पाटील, पिरकोन – ९२ .२४ टक्के, सिटिझन हायस्कूल,उरण – ९८.५३ टक्के, सेंट मेरीज ज्युनिअर महाविद्यालय, उरण -९८.२५ टक्के, रामचंद्र म्हात्रे ज्युनिअर महाविद्यालय, आवरे – ९२.१३ टक्के, आर. एन. ठाकूर ज्युनिअर महाविद्यालय, दिघोडे – ७४.१९ टक्के, रोटरी इंग्लिश ज्युनिअर महाविद्यालय, उरण – ९५.४५ टक्केतर नवीन शेवे कनिष्ठ महाविद्यालयाचा – ८८.७३ टक्के निकाल लागला आहे.

Story img Loader