भाऊसाहेब थोरात हे निसर्ग नेते होते. सहकारातून ग्रामीण भागाचा विकास करताना उच्च नीतिमूल्यांची शिकवण त्यांनी दिली. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘राजीव गांधी पर्यावरणरत्न’ पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे आदींनी मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे, माजी आमदार धोंडिभाऊ वाघमारे, नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे आदी या वेळी उपस्थित होते.
त्यांचाच वारसा बाळासाहेब थोरात पुढे नेत आहेत. थोरात म्हणाले, झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून भाऊसाहेबांना दंडकारण्य अभियानाची कल्पना सुचली. त्यानंतर झपाटल्यागत काम करत कार्यकर्ते जनतेच्या मदतीने कोटय़वधी रोपे, बियांची लागवड तालुकाभर झाली. पर्यावरणात चांगले काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था या सर्वासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतात. त्यांचा राज्यपातळीवर गौरव होतो ही आनंदाची बाब आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge contribution of bhausaheb thorat for save the environment dr mulik